शेतकरी आंदोलनावरुन कंगना रानौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर

कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. | Kangana Ranaut

शेतकरी आंदोलनावरुन कंगना रानौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 10:39 PM

नवी दिल्ली: दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यात सुरु झालेले ट्विटर वॉर आता शिगेला पोहोचला आहे. कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे पातळी सोडून दिलजित दोसांझ याच्यावर टीका केली. मात्र, दिलजित दोसांझ यानेही कंगनाला तितक्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. (Kangana Ranaut and Diljit Dosanjh twitter war)

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेला बिलकिस बानो म्हणत त्यांची खिल्ली उडविली होती. त्यावर दिलजित दोसांझ याने ‘कोणी इतकेही आंधळे असू नये’, अशी टिप्पणी केली होती.

त्यावर कंगना रानौत हिने नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलत दिलजित दोसांझवर टीका केली. तिने दिलजितला करण जोहरचा ‘पाळीव कुत्रा’ म्हटले. तू रोज ज्यांची चाटून काम मिळवतोस मी त्यांची रोज वाजवते. त्यामुळे जास्त उडू नकोस. मी कंगना रानौत आहे, तुझ्यासारखी चमची नाही, अशा अत्यंत खालच्या भाषेत कंगनाने दिलजितवर टीका केली.

कंगनाच्या या ट्विटला दिलजित दोसांझ यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. तू आजपर्यंत जितक्या जणांबरोबर चित्रपट केलेस, त्यांची तू पाळीव आहेस का? मग तर ही यादी वाढतच जाईल. आम्ही बॉलिवूडवाले नाही तर पंजाबवाले आहोत. खोटं बोलून लोकांना चिथवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगले जमते, असे दिलजितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. त्यामुळे आता आगामी काळात दिलजित आणि कंगनातील हे ट्विटर वॉर आणखीनच भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी ट्विट करून दिलजित दोसांझला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेत्री स्वरा भास्कर याचा समावेश आहे.

कंगना रानौतचे ट्विटर अकाऊंट बंद करा; उच्च न्यायालयात याचिका

अभिनेत्री कंगना रानौतचे ट्विटर अकाऊंट निलंबित ( suspend ) करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. CRPC कलम 482 प्रमाणे तिच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कंगना रानौत ट्विटरच्या माध्यमातून देशात विष पसरवत आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

Kangana Ranaut | शेतकरी आंदोलनात सामील ‘दादी’वर टीका, कंगनाला 7 दिवसांत माफी मागण्याचा ‘अल्टीमेटम’

(Kangana Ranaut and Diljit Dosanjh twitter war)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.