आरोप खोटे ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, कंगनाचा पवित्रा

कंगणाने देखील टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझा एकही आरोप चुकीचा ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे, असं कंगणा म्हणाली.

आरोप खोटे ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, कंगनाचा पवित्रा
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 10:22 PM

नवी दिल्ली: सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा अहवाल एम्सच्या पथकाने दिला आहे. नेटिझन्सनी यानंतर सोशल मीडियावर कंगना रणौतला ट्रोल करण्यास सुरुवात केली. #KanganaAwardWapasKar हा ट्रेंड सोशल मीडियामध्ये सुरू आहे. कंगनाने देखील टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. माझा एकही आरोप चुकीचा ठरल्यास सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचं वचन आहे, असं कंगना म्हणाली. (Kangana response to trend KanganaAwardWapasKar)

कंगनाने #KanganaAwardWapasKar या ट्रेंडसह एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक शेअर केली आहे. “ही माझी मुलाखत आहे. जर तुमची स्मृती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, मी एखादा खोटा किंवा चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन, हे क्षत्रियाचे वचन आहे, मी रामाची भक्त आहे. जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही”, असं उत्तर कंगनानं दिलं आहे.

एका मुलाखतीमध्ये कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भाष्य केलं होते. त्यामध्ये सुशांतच्या आत्महत्येला तिने खून असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये  दावे खोटे ठरले तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं कंगनानं म्हटलं होतं.

एम्सच्या मेडिकल बोर्डाने राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात हत्येची शक्यता नाकारल्याची माहिती एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे अध्यक्ष गुप्ता यांनी शनिवारी दिली होती.

दरम्यान, कंगना रणौत सध्या जयललिता यांच्या जीवनावरील थलायवी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

संबंधित बातम्या :

“माझ्या ऑफिस ऐवजी इकडे लक्ष दिलं असतं तर लोक वाचले असते” – कंगणाची मुख्ममंत्र्यावर टीका

Pulwama Attack: जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर कंगणांचं टीकास्त्र

(Kangana response to trend KanganaAwardWapasKar)

बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.