लखनौ : कानपूरमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधून विकास दुबेला बेड्या ठोकण्यात आल्या. (Kanpur Encounter Accuse Vikas Dubey Arrested)
गँगस्टर विकास दुबेला अत्यंत नाट्यमय पद्धतीने अटक झाली. आधी त्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दोन सहकाऱ्यांसोबत देवाचे दर्शन घेतले. विकास दुबे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला ओळखले. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.
पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने आपली ओळख कबूल केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंग यांनी दिली. त्याच्या दोघा साथीदारांना गेल्या दोन दिवसात कंठस्नान घालण्यात आले होते.
Vikas Dubey, the main accused in #KanpurEncounter case, has been arrested at a police station in Ujjain (Madhya Pradesh), say UP Govt Sources pic.twitter.com/txjmhzJhmW
— ANI (@ANI) July 9, 2020
कोण आहे विकास दुबे?
विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.
#WATCH Madhya Pradesh: After arrest in Ujjain, Vikas Dubey confesses, “Main Vikas Dubey hoon, Kanpur wala.” #KanpurEncounter pic.twitter.com/bIPaqy2r9d
— ANI (@ANI) July 9, 2020
कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.
हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती. (Kanpur Encounter Accuse Vikas Dubey Arrested)