Kapil Sharma | ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नका’, शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून कपिल शर्मा भडकला!
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे.
मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत असून, जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. रविवारीसुद्धा (29 नोव्हेंबरला) शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्विट केले आहे. शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून संतापलेल्या कपिल शर्माने या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन केले आहे (Kapil Sharma Angry on government over farmer protest in Delhi).
‘कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याल प्रश्नाला राजकीय वळण देऊ नका’, असे आवाहन कपिल शर्माने केले आहे. ‘आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत’, असे म्हणत त्यांने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
किसानो के मुद्दे को राजनीतिक रंग ना देते हुए बातचीत से इस मसले का हल निकालना चाहिए।कोई भी मुद्दा इतना बड़ा नहीं होता के बातचीत से उसका हल ना निकले।हम सब देशवासी किसान भाइयों के साथ हैं। यह हमारे अन्नदाता हैं।#farmers
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2020
(Kapil Sharma Angry on government over farmer protest in Delhi)
कृषी कायदा रद्द करण्याची मागणी…
कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलन पाहता, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठकही बोलविण्यात आली होती, ज्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेदेखील सहभागी झाले होते. ही बैठक सुमारे 2 तास चालली (Kapil Sharma Angry on government over farmer protest in Delhi).
दिल्लीमध्ये प्रदर्शन करण्याची परवानगीः आप
दरम्यान, आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत शेतक-यांना निषेध करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना निषेध करायचा आहे, तिथे परवानगी देण्यात यावी. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत केंद्र सरकारला शेतक-यांशी तातडीने बिनशर्त चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी आपल्या पत्राद्वारे पंतप्रधान मोदींना शेतकर्यांचे म्हणणे ऐकून कृषी कायद्यांचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. शेतकरी आंदोलनावरूनही काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला. पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर हल्ला केला.
(Kapil Sharma Angry on government over farmer protest in Delhi)
संबंधित बातम्या
शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित, असं मी कधी म्हटलंच नव्हतं: अमित शाह
अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा; शेतकरी आंदोलनाची भारावणारी दृश्यं