कपिल शर्मा शोच्या लेखकाची पहिल्या चित्रपटाची कमाई तब्बल…
एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म म्हणून ड्रिम गर्ल बनली आहे.
मुंबई : एकता कपूर प्रोडक्शनची ड्रीम गर्ल फिल्म जवळपास 30 कोटींमध्ये तयार झाली आहे. पण या फिल्मने 200 कोटी रुपयांची कमाई (Kapil Sharma show writer Raj Shaandilyaa First Movie) केली आहे. एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म म्हणून ड्रिम गर्ल बनली आहे. एकता कपूरने दिग्दर्शक राज शांडिल्यला नुकतेच 90 लाखांची जॅग्वॉर कार (Kapil Sharma show writer Raj Shaandilyaa First Movie) गिफ्टमध्ये दिली.
विशेष म्हणजे ड्रिम गर्ल फिल्मचे दिग्दर्शन करणारे राज शांडिल्य कोणी एकेकाळी कपिल शर्मा कार्यक्रमासाठी स्क्रिप्ट लिहायचे. राज शांडिल्य यांनी कॉमेडी सर्कस कपिल शर्मा कार्यक्रमासाठी आतापर्यंत 200 स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारे शांडिल्य यांनी 2006 मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कॉमेडी शोमधून सुरुवात केली होती.
राज शांडिल्यने जवळपास 350 स्क्रिप्ट कृष्णा अभिषेक, सुदेश लहरीसाठी कॉमेडी सर्कस दरम्यान लिहिली होत्या. त्याच्या नावावर वर्ष 2013 मध्ये 625 स्क्रिप्ट लिहिण्याचा रेकॉर्ड लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे. कपिल शर्मा, कृष्णा अभिषेकसह राज शांडिल्याचे खूप जवळचे नाते आहे.
कॉमेडी सर्कसदरम्यान ड्रिम गर्लची कल्पना सुचली
“बऱ्याचदा आम्ही मुलांना मुली बनवले आहे. हे काम तर कॉमेडी सर्कसपासून सुरु आहे. पण मला जेव्हा या कथेबद्दल एका लेखकाने ऐकवले तेव्हा ही कथा जुनी वाटली. पण म्हटले प्रयत्न करुन पाहुया. मला विश्वास होता ही गोष्ट सर्वांना आवडेल”, असं राज शांडिल्याने सांगितले.