Corona | सैफ-करीना ते सारा-तैमुर, कपूर कुटुंबाची मदत, मुख्यमंत्र्यांकडून आभार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात (Kareena and saif donate to pm and cm relief fund) आली.
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात (Kareena and saif donate to pm and cm relief fund) आली. त्यानंतर देशभरातील दिग्गज मंडळींनी कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करिना कपूर-खान, सारा अली खान आणि तैमुर अली खान यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी मदत दिल्याचा आकडा (Kareena and saif donate to pm and cm relief fund) सांगितलेला नाही.
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सरकारला मदत दिल्याची माहिती दिली आहे. करिना कपूर, सैफ आणि सारासोबत तैमुरनेही आर्थिक मदत केल्याने सर्वच स्तरातून तैमुरचे कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करत या चौघांचे आभार व्यक्त केले आहे.
Thank you ?? pic.twitter.com/Br4bIxsA9O
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 5, 2020
“मी, सैफ अली खान आणि तैमुर अली खान आम्ही सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. तुम्ही सर्वांनीही सरकारला आर्थिक मदत करा”, असे आवाहन करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना केले आहे.
कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करिना, सैफ आणि तैमुर घरात वेळ घालवत आहेत. त्यासोबत त्यांनी इतरांनाही घरी राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आतापर्तंय 500 च्या वर कोरोना रुग्ण पोहोचले आहेत. तर देशात 3 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.