“कर्नाटकचा निकाल म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरूवात”
Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकातील निवडणुकीचा निकाल, 2024 ची लोकसभा निवडणूक अन् काँग्रेसचा नवा आशेचा किरण; वाचा सविस्तर...
Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकातील विजय ही लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरुवात आहे, असं काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 67 जागांवर समाधान मानावं लागत आहे. जेडीएस 19 जागांवर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. कर्नाटकच्या आजच्या निकालांमुळे काँग्रेसला पुन्हा नवा आशावाद मिळाला आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
ही तर लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरुवात
काँग्रेसचे माजी गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या 2024 च्या लोकसभा विजयाचा गुलाल कर्नाटकातून उधळला आहे, असं एम. बी. पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराला कर्नाटकातील जनतेने नाकारलं. भाजप सरकारने कर्नाटकमध्ये चाळीस टक्के भ्रष्टाचार केला होता, त्यामुळं जनतेने त्यांना नाकारलं आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी कर्नाटकमधूनच विजयाची सुरवात केली होती. आताही 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयाची सुरूवात आज झाली आहे, असं ते म्हणालेत.
कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होईल? यावर एम. बी. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सत्तास्थापनेच्या आगामी कार्यक्रमावरही ते बोलतेत.
राज्यातील लिंगायत समाज, धनगर, एस.सी., एस.टी. तसेच वाक्कलगी आदी समाज सुरवातीपासून काँग्रेससोबत होता. जनतेच्या बळावरच काँग्रेस सत्तेत आलीये. मुख्यमंत्री कोण असेल हे हायकमांड ठरवतील. आम्ही हैद्राबादला जाणार नाही तर बंगळुरूमध्ये आमची बैठक होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
#WATCH बेंगलुरु: कर्नाटक विधानसभा चुनाव की मतगणना जारी है। रुझानों में कांग्रेस ने बहुमत हासिल कर लिया है। इस मौके पर कर्नाटक कांग्रेस प्रमुख डी.के. शिवकुमार ने अपने आवास से लोगों का अभिवादन स्वीकार किया।#KarnatakaElectionResults pic.twitter.com/a7YKOJlkS2
— ANI_HindiNews (@AHindinews) May 13, 2023
कर्नाटकातील विजयावर राहुल गांधी म्हणतात…
कर्नाटकात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानलेत. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला गरीब जनता होती आणि एका बाजूला ताकतवर नेते होते. आम्ही गरिबांच्या मुद्द्यांवर लढलो. आम्ही द्वेषाने राजकारण करत लढाई लढलो नाही. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे प्रेमाची दुकान खोलली आहेत. आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी आश्वासनं दिली होती. ती आम्ही पूर्ण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यावेळी दिली.