EVM वरुन काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद, उदित राज यांना संशय तर कार्ती चिदंबरम यांचे इव्हीएमला समर्थन

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसाही लागला तरी इव्हीएमला दोष देणं बंद केलं पाहिजे, असं वक्तव्य काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केले आहे. Karti Chidambaram said stop blaming evm for election result

EVM वरुन काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद, उदित राज यांना संशय तर कार्ती चिदंबरम यांचे इव्हीएमला समर्थन
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:58 PM

नवी दिल्ली :  बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल कसाही लागला तरी इव्हीएमला दोष देणं बंद केलं पाहिजे, असं वक्तव्य काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केले आहे. माझ्या अनुभवानुसार इव्हीएम सुधारित, अचूक यंत्रणा आहे, असंही कार्ती चिदंबरम म्हणाले आहेत. काँग्रेसने उदित राज यांनी आजच इव्हीएम बद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे इव्हीएमवरुन काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. (Karti Chidambaram said stop blaming evm for election result)

इव्हीएम ही अचूक आणि विकसित यंत्रणा आहे, असं माझ मत कायम राहिले आहे. इव्हीएमबद्दल शंका असणारे लोक विविध पक्षांमध्ये आहेत. हे शंका घेणारे लोक ज्यावेळी त्यांच्या विरोधात निवडणुकीचा निकाल जातो त्यावेळी इव्हीएमला दोष देतात. इव्हीएममध्ये फेरफार होतात हे कोणीही शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध करु शकलं नाही, असंही कार्ती चिदंबरम म्हणाले आहेत.

चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या सॅटेलाइटला पृथ्वीवरून नियंत्रित केलं जाऊ शकतं तर ईव्हीएम मशीन का हॅक केल्या जाऊ शकत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते डॉ. उदित राज यांनी केला आहे. उदित राज यांनी ट्विट करून बिहार निवडणुकीवर भाष्य केलं आहे. अमेरिकेत ईव्हीएम मशीन असत्या तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले असते काय?, असा सवाल उदित राज यांनी एका ट्विटमधून केला आहे.

दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी ईव्हीएम मशीनचा थेट संबंध चंद्र आणि मंगळ ग्रहाशी जोडला आहे. चंद्र आणि मंगळावर जाताना त्या उपक्रमाची दिशा जर पृथ्वीवरून नियंत्रित केल्या जाऊ शकते तर ईव्हीएम का हॅक केल्या जाऊ शकत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता. यावेळी त्यांनी ईव्हीएमला ‘एमव्हीएम’ म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशीन’ असं नाव दिलं होतं.

संबंधित बातम्या :

तेजस्वी यादव बिहार निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ : संजय राऊत

Bihar Election Result : मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?: उदित राज

(Karti Chidambaram said stop blaming evm for election result)

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.