‘सारेगमप’ फेम गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.
पुण्यातील इंजिनिअर रोनित पिसे कार्तिकीचा भावी जोडीदार बनणार आहे.
लॉकडाऊनच्या काळातच म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा साखरपुडा पार पडला होता.
या खास सोहळ्याचे फोटो कार्तिकीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले होते.
मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत रविवार 26 जुलैला साखरपुडा संपन्न झाला होता.
कार्तिकीने आज (21 नोव्हेंबर) वडिलांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत, त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
कार्तिकीच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता कार्तिकीच्या लग्नाला ठाकरे परिवार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.