नवी दिल्लीः काशी विश्वनाथ मंदिर (Kashi temple). भारतातले (India) एक पवित्र स्थळ. दरवर्षी येथे लाखो भाविक हजेरी लावतात. आपला देह शेवटी याच परिसरात सोडावा म्हणून अनेक जण काशीला येऊन राहतात. असा या धार्मिक स्थळाचा महिमा. आता याच काशी विश्वनाथ मंदिराला (KVT) दक्षीण भारतातल्या एका व्यापाऱ्याने तब्बल 60 किलो सोने दान केले आहे. त्यात 37 किलो सोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या वजनाइतके आहे. या सोन्याचा उपयोग मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीना सजवण्यासाठी करण्यात आला आहे. दान सत्पात्री असते. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळू नये म्हणतात. हेच ध्यानात घेऊन या व्यापाराने आपले नावही गुप्त ठेवायला पसंदी दिलीय.
कधी झाले दर्शन?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काशी लोकसभा मतदार संघ. त्यांनी आपल्या दौऱ्यात नुकतीच काशीला भेट दिली. रविवारी मंदिरात जाऊन पूजा-अर्चा केली. यावेळी मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती या सोन्याने मढवलेल्या दिसल्या. हे सोने पंतप्रधानांच्या आईच्या वजनाइतके आहे. सध्या मोदी यांच्या आई हिराबेन यांनी वयाची शंभरी गाठलीय. वाराणसीचे विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल म्हणाले की, मंदिराला 60 किलो सोने मिळाले आहे. त्यातील 37 किलो सोन्याचा वापर करून मंदिराच्या गर्भगृहातील भिंती सजवल्या आहेत. उरलेल्या 23 किलो सोन्याचा उपयोग मुख्य मंदिराच्या कामात केला. त्यात सुवर्ण घुमटाचा खालचा भाग झाकण्यात आला.
18 व्या शतकानंतर काय घडले?
मंदिराच्या कोणत्याही भागासाठी सोन्याचा वापर करण्याची ही 18 व्या शतकानंतर दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. मुगलांनी भारतात आक्रमण केले, तेव्हा त्यांनी अनेक मंदिरे जमीनदोस्त केली. या मंदिरांचा जीर्णोद्धार 1777 मध्ये इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यानंतर पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांनी एक टन सोने दान केले होते. त्याचा उपयोग मंदिराचे दोन घुमट झाकण्यासाठी करण्यात आला होता.
Prime Minister Narendra Modi offers prayers at Kashi Vishwanath temple, Varanasi pic.twitter.com/6uGtK3wiwT
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 27, 2022
900 कोटी खर्च
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये भाजप सत्तेत आले. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार काम करण्यात आले. काशी विश्वनाथ धाम कॉरिडोर योजनेंतर्गत 900 कोटी खर्च करण्यात आले. त्यासाठी मंदिराशेजारच्या 300 पेक्षा जास्त इमारतींची खरेदी केली. जुने मंदिर 2700 चौरस फुटाचे होते. ते वाढवून 5 चौरस फुटाचे करण्यात आले. त्यामुळे जलासेन, मणिकर्णिका आणि ललिता घाटाच्या माध्यमातून थेट गंगेशी संपर्क झाला.
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग