Kedar Shinde | केदार शिंदेंचा ‘सुखी माणसाचा सदरा’ ‘या’ खास व्यक्तीला समर्पित!
मालिकेच्या निमित्ताने या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेसह भरत जाधवही अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
मुंबई : अनेक दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका (Kedar Shide New Serial) सध्या चर्चेत आहे. या मालिकेबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता भरत जाधव या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेच्या निमित्ताने या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदेसह भरत जाधवही अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.(Kedar shinde dedicate his new serial to hrishikesh Mukherjee)
या मालिकेमागची प्रेरणा केदार यांनी नुकतीच शेअर केली आहे. त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, ‘साधं सोपं निर्मळ… सादर करून खुप काही शिकवून जाणारे… ऋषिकेश मुखर्जी.. #sukhimanasachasadara हे त्यांना अर्पण… धावपळीच्या जगात हल्ली आपण श्वास घ्यायला विसरू लागलोय. तो शांत श्वास #25october पासून’ 25 ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’ ही मालिका त्यांनी दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना समर्पित केली आहे. (Kedar shinde new serial)
राज ठाकरेंनी केले कौतुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या (Raj Thackeray Praises Bharat Jadhav) नव्या मालिकेवरुन त्यांचं आणि अभिनेता भरत जाधवचं भरभरुन कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांचं रंगभूमीवरील प्रेम सर्वश्रुत आहे. ते नेहमीच मराठी सिनेमा आणि कलाकरांच्या अभिनयाला दाद देत असतात. त्यांनी भरत जाधव आणि केदार शिंदे यांची नव्या मालिका ‘सुखी माणसाचा सदरा’चा प्रोमो शेअर करत त्यांचं कौतुक केलं (Kedar shinde dedicate his new serial to hrishikesh Mukherjee).
राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेचा प्रोमो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
…आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरं जाण्याची ताकद मिळेल हे केदार,भरत तुम्ही नक्की पहा. बाकी तुम्हा दोघांना आणि तुमच्या टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा. @mekedarshinde pic.twitter.com/OTPO9HYs1x
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2020
“कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं”, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं.
“भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल”, असं म्हणत त्यांनी भरत जाधवचं कौतुक केलं.
(Kedar shinde dedicate his new serial to hrishikesh Mukherjee)