Ketaki Chitale : केतकी चितळेचा मुक्काम आणखी एक-दोन दिवस तुरुंगातच, जामीन अर्जावर निर्णय नाही, गोरेगाव पोलिसांच्याही ताब्यात नाही
पोलिसांचे आणि सरकारी वकिलांचे म्हणणे आले नसल्यामुळे केतकी चितळे हीचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयात बुधवारी राखीव ठेवण्यात आला आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी या जामीन अर्जावर सरकारी वकील आणि पोलिसांचे म्हणणे कोर्टात मांडले जाईल, आणि त्यानंतरच तिच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
ठाणे – शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी (Ketaki Chitale) चितळेला बुधवारीही दिलासा मिळू शकलेला नाही. आज ठाणे कोर्टाने जरी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुानवली असली, तरी तिच्या जामिनाबाबत मात्र आज निर्णय होऊ शकलेला नाही. पोलिसांचे आणि सरकारी वकिलांचे म्हणणे आले नसल्यामुळे केतकी चितळे हीचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयात बुधवारी राखीव ठेवण्यात आला आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी या जामीन अर्जावर सरकारी वकील आणि पोलिसांचे म्हणणे कोर्टात मांडले जाईल, आणि त्यानंतरच तिच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे. केतकीला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर गोरेगाव आणि पुण्याचे पोलीस तिचा ताब्यात घेण्यासाठी ठाण्यात दाखल झाले आहेत.
आज गोरेगाव पोलिसांना ताबा नाही
दरम्यान तिचा ताबा बुधवारी गोरेदाव पोलिसांना देण्यात येणार होता, मात्र त्याबाबत बुधवारी निर्णय झालेला नाही. जेजेत तिच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिला ठाणे जेलमध्येच परत आणण्यात आले असून, बुधवारचा तिचा मुक्काम ठाण्याच्या कारागृहातच असेल.
गोरेगाव, पुण्यासह इतरही ठिकाणी अटकेची शक्यता
ठाणे सत्र न्यायालयात सुनावणीवेळी गोरेगाव आणि पुणे पोलीस तिचा ताबा घेण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाकडून केतकीची कोठडी गोरेगाव पोलिसांकडे देण्यात आलीय. मात्र बुधवारी याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
उद्या गोरेगांव पोलिसांना केतकी चितळेचा ताबा
गोरेगांव पोलिसांना केतकी चितळेचा ताबा उद्या मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जे जे रुग्णालयात उपचार करून ठाणेजेल मध्ये आणण्यात उशीर झाल्याने केतकी चितळेला आजची रात्र ठाणे कारागृहातच काढावी लागणार आहे. वेळे अभावी आज गोरेगाव पोलिसांनी ताबा मिळाला नाही. आजच ठाणे कोर्टानं गोरेगांव पोलिसांना केतकी चितळेचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडूनही टीका
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही केतकीला फटकारलं आहे, एखाद्याने सोशल मीडियाचा वापर कसा करावा, हा जरी व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं. टीका सुद्धा अशी करावी ज्यात कुठेही बीभत्सपणा नसावा. तो बीभत्सपणा त्या टीकेमध्ये आढळला. त्याच्याबद्दल निंदा व्यक्त करते. पण आम्ही लहानपाणापासून राजकारण जवळून पाहिलंय. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, पण लोकं पेपरमधून लिहित होते. बऱ्याचदा भाषा घसरायची, हे आम्ही लहानपणापासून पाहिलंय. त्यावेळी आम्ही मुंडे साहेबांना विचारायचो की हे असं लिहिलेलं तुम्ही सहन कसं करता. त्यावर ते म्हणायचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यांची व्याख्या जरा वेगळ्या पदधतीने घेतली जाते आहे. पण मला असं वाटतं की तिच्या वयाचा आणि सगळ्या बाबींचा विचार करता एक वॉर्निंग देऊन या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला पाहिजे. पवारसाहेब खूप मोठे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडे यांनी दिली आहे.