आम्हाला बांबू लावायचे काम सुरू; अजित पवार असं का म्हणाले?

आमदार दिलीप मोहिते पाटील अजितदादाच्या राष्ट्रवादी गटात आहेत. त्यांच्यावर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचे काम सोपविण्यात आले आहे. अजितदादा यांनी जर खेडची जागा आपल्या वाट्याला आली तर दिलीप मोहीते यांची उमेदवारी फिक्स असे म्हटले आहे.

आम्हाला बांबू लावायचे काम सुरू; अजित पवार असं का म्हणाले?
ajitdada pawar
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 9:00 PM

खेड येथे अजितदादांचा राष्ट्रवादी गटाचा मेळावा झाला. यावेळी भाषण करताना अजितदादा म्हणाले की आमच्या सोबत दिलीप मोहीते पाटील आले आहेत. आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रवादीचे काम करीत आहोत. पाच वर्षातले तीन वर्षे आम्हाला काम करता आले आहे. तीन वर्षांमध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या कार्यसम्राट आमदारांनी साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. आजपर्यंत जेवढे आमदार झालेले असतील त्यांची कारकीर्द काढा आणि दिलीप मोहिते यांची पाच वर्षांची कारकीर्द काढा. काही जणांना वाटलं असेल की यांनी काय निर्णय घेतला ? तुम्ही निर्णय घेतला तो चालतो, मात्र आम्ही जनतेसाठी हा निर्णय घेतलाय. जर खेडची जागा आमच्या वाट्याला आली तर येथून दिलीप मोहीते पाटलांची उमेदवारी फिक्स समजा अशी घोषणा अजितदादांनी आज येथून केली आहे.

ते पुढे म्हणाले की, आमच्या मध्ये अजूनही काही तरी करण्याची धमक आहे.आम्ही दिलीप मोहिते पाटील यांना आमदार केलं, मात्र त्यांना मंत्री पद दिलं नाही अशी खंत तुमची आहे. खेडची जागा जर आपल्याला आली तर दिलीप मोहिते यांची उमेदवारी फिक्स असून त्यांना मंत्रीपद देखील मिळेल… हे महायुतीचे सरकार आहे, घटक पक्षाला विश्वासात घेवून काम करायचे आहे. आज दिवसभर उद्घाटन केलीत. ही केलेली कामे चांगली झाली आहेत. आरोग्य केंद्राचे काम उत्कृष्ट झालंय, त्यामुळे लोकांची येण्याची संख्या वाढली. पूर्वी लोक येत नव्हती, हे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या सत्तेचा वापर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो हे आम्ही शिकलोय असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

चक्की पिसिंग करायला लावणार

खेड आरोग्य केंद्राचं काम बोस कंपनीने सीआरएस फंडातून केले आहे. अशी उत्कृष्ट कामं आपल्याकडे का होत नाहीत? याची विचारणा मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. आम्ही पैसे देतो मग काम का होत नाही असाही सवाल यावेळी अजितदादांनी केला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहिणी योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत. यामध्ये खेड तालुक्यात १ लाख ३ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. एका महिलेला एका योजनेचा लाभ घेता येणार आहे. एका नवरा बायकोने तर २६ नावे दाखविली. आम्हाला बांबू लावायचे काम करत आहेत. आमची द्यायची दानत आहे, तुम्ही लाभ घ्या, पण ऐपत असताना असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवत चक्की पिसिंग करायला लावणार असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते

आता अमोल कोल्हेचा फोटो लागला तर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरु झाली. अरे तो इथला खासदार आहे म्हणून लावला फोटो. अरे बाबांनो जरा मागचा-पुढचा विचार करा. हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही. विविध विकास कामांचे लोकार्पण होतंय. मग तिथं प्रोटोकॉल पाळावा लागतो. मागे माझा एक आमदार अमुक अमुक नेत्याला भेटायला गेला मी त्या आमदाराला फोन केला तर तो बोलला दादा मी इथच आहे. मागे मी वेष बदलून दिल्लीला गेलो अशा बातम्या चालल्या. अरे बाबानो तो एअरपोर्ट आहे, तेथे नाव आणि माणूस पाहून सोडले जाते. मला कोणाच्या बापाची भीती नाही, मी काय कोणाचं घोडं मारलंय का? एक मायचा लाल आणा अन दाखवा की ह्याने चिरीमिरी घेऊन कामं केली. पण विनाकारण नको त्या बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते असेही अजितदादा यावेळी म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.