Kia Motors च्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या

कार निर्मिती करणारी कोरियन कंपनी Kia Motors ने 2019 मध्ये भारतात Kia Seltos ही कार लाँच केली होती.

Kia Motors च्या 'या' कारमध्ये आढळला दोष; कंपनीने सर्व गाड्या परत मागवल्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 11:46 PM

मुंबई : कार निर्मिती करणारी कोरियन कंपनी Kia Motors ने 2019 मध्ये भारतात Kia Seltos ही कार लाँच केली होती. कंपनीने आता या कारच्या डिझेल व्हेरिएंटमधील सर्व गाड्या परत मागवल्या आहेत. या कारच्या फ्यूल पंपांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे, असं कंपनीच्या लक्षात आलं आहे, त्यामुळेच कंपनीने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. (Kia Motors Recalled Seltos diesel silently in India over faulty fuel pump)

कंपनीने म्हटलं आहे की, 1 ऑक्टोबर 2019 ते 13 मार्च 2020 या दरम्यान बनवलेल्या सेल्टॉस कारच्या सर्व डिझेल व्हेरिएंटच्या इंधन पंपांमध्ये दोष आढळला आहे. त्यामुळे आम्ही डिझेल व्हेरिएंटच्या सर्व कार परत मागवल्या आहेत. इंधन पंपातील या त्रुटीमुळे कारचं मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळेच आम्ही रिकॉलचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने यावेळी ग्राहकांना सांगितलं आहे की, कार परत मागवल्यानंतर आम्ही कारच्या इंधन पंपाची तपासणी करु, त्यामध्ये कोणताही दोष आढळल्यास आम्ही मोफत दुरुस्त करुन देऊ, आणि जर पंपामध्ये कोणताही दोष आढळला नाही तर तो पंप न बदलला पूर्ण तपासणी करु कार परत करु.

क्रॅश टेस्टमध्ये सेल्टॉसला तीन स्टार रेटिंग

दरम्यान किया मोटर्सने नुकताच सेल्टॉस कारचा क्रॅश टेस्ट रिपोर्ट जाहीर केला होता, सोबतच कारच्या सेलबाबतही माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, कंपनीने आतापर्यंत भारतात 1.25 लाखांहून अधिक सेल्टॉस कार्सची विक्री केली आहे. तसेच ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

ही कार तीन इंजिनांच्या पर्यायासह लाँच करण्यात आली होती. यापैकी पहिलं इंजिन 1497cc चं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 6300 Rpm वर 113.42 Hp इतकी पॉवर आणि 4500 Rpm वर 144 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 6 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन आणि आयव्हीटीच्या पर्यायासह उपलब्ध आहे.

या कारमध्ये 1353cc दुसरं इंजिन देण्यात आलं आहे, जे 6000 Rpm वर 138 Hp इतकी पॉवर आणि 1500-3200 Rpm वर 242 Nm टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 6 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन आणि 7 स्पीड डीसीटीच्या पर्यायासह उपलब्ध आहे.

या कारमध्ये 1493cc च्या तिसऱ्या डिझेल इंजिनाच्या पर्याय देण्यात आला आहे, जे 4000 Rpm वर 113.42 Hp इतकी पॉवर आणि 1500-2750 Rpm वर 250 टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 6 स्पीड मॅनुअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.

Kia Seltos मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, 6 एयरबॅग, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट सिस्टिम, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टेबिलिटी मॅनजमेंटचा समावेश करण्यात आला आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 9.89 लाख रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या

Kia Motors च्या ‘या’ कारची मार्केटमध्ये धुम, एका महिन्यात 11,721 युनिट्सची विक्री

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

(Kia Motors Recalled Seltos diesel silently in India over faulty fuel pump)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.