संजय राऊत हाणा मला, सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, भर प्रेस कॉन्फरन्समध्ये हायव्होल्टेज ड्रामा

19 बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं..' असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.

संजय राऊत हाणा मला, सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, भर प्रेस कॉन्फरन्समध्ये हायव्होल्टेज ड्रामा
पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी दाखवले जोडे
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:19 AM

नवी दिल्ली | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी केली होती. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी काल ठाकरे कुटुंबाचा आणि बंगल्यांचा काही संबंध आहे, ही बाब नाकारली होती. अलिबागमधील (Alibagh Bungalow) ती बेनामी प्रॉपर्टी असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले

काय म्हणाले किरीट सोमय्या?

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी मोठा ड्राम केला. ते म्हणाले, ‘ त्यांनी हा बंगल्यांचा विषय काल का काढला. संजय राऊत जोड्यांनी मारा म्हणताय किरिट सोमय्याला? अरे जोड्याने मला मारणार तू… असे म्हणत किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत पायातला जोडा काढला. ‘मला मारायचं असेल तर मला मारा की जोड्यानं.. मी माझाच जोडा देतो संजय राऊतांना.. मी उभा आहे तुमच्यासमोर. 19 बंगल्याच्या वादाप्रकरणी संजय राऊत किरीट सोमय्याला जोडे मारणार असेल तर मी माझा जोडा संजय राऊतच्या हातात द्यायला तयार आहे. त्यानी केलेल्या बंगल्यासंबंधी मी पुरावे दिले आहेत. त्यांनी याबाबत रश्मी ठाकरेंना याबाबत विचारावं..’ असा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला.

रश्मी वहिनींना राऊतांनी विचारावं – किरीट सोमय्या

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, रश्मी वहिनींना संजय राऊतांनी विचारावं की, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी या बंगल्यांसाठीचा टॅक्स भरलाय की नाही? आम्ही आरटीजीएस केलं नव्हतं, आम्ही कर भरला नव्हता. ग्रामपंचायतीनं आमच्या नावावर बंगले केले नव्हते. प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये आमच्या नावाने नाही, किरीट सोमय्याने आमच्याविरोधात पोलीस तक्रार केलेली नाही.. असं जर रश्मी ठाकरे म्हणाल्या तर मला दोन्ही जोडे मारा…’ असं किरीट सोमय्या म्हणाले.

जोड्यानं मारू मला म्हणाले की रश्मी ठाकरेंना?

किरीय सोमय्या यांनी संजय राऊत यांना उलट सवाल केला. ते म्हणाले,’ हे बंगले किरीट सोमय्यांच्या नावे नाही तर रश्मी ठाकरे यांच्या नावाने आहेत, रश्मी उद्धव ठाकरे यांनी 2019-20 वर्षासाठीचा हा टॅक्स भरला. त्याआधीचा टॅक्स 12/11/2020 ला अन्वय नाइकच्या नावाने होता. हा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरलाय. किरीट सोमय्याने नाही. संजय राऊत साहेब, आपण जोड्याने कुणाला मारणार? 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत 19 बंगल्याचा घरपट्टी, दिवबत्ती कर, आरोग्य कर हा रश्मी उद्धव ठाकरे यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट आरटीजीएस केलेला दिसतोय. अन्वय नाइक आणि उद्धव ठाकरे यांचे जमिनीसंबंध किरीट सोमय्याने खुलासा केला होता. त्यानंतर हे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.’ असे पुरावे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

इतर बातम्या-

Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पत्रकार म्हणाले, पुरावे पुरावे, राऊत म्हणाले, सोड रे, कोणय सोमय्या, राऊतांकडे पुरावे नाहीत?

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....