PPF vs NPS | अधिक परताव्यासाठी कोणती योजना आहे फायदेशीर, कुठे पैसे असतील सुरक्षित आणि करातून मिळेल सूट
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही थोडा धोका पत्करला तर पीपीएफपेक्षा एनपीएसमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. (know the best investment plan for more returns, where the money will be safe and will be tax deductible)
नवी दिल्ली : भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक सरकारी योजना असल्या तरी, पीपीएफ आणि एनपीएस या दोन योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हे दोन्ही ऐच्छिक योगदानाचे पर्याय आहेत. उत्तम रिटर्न्ससह करात सूट देखील मिळते. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सरकारी कर्मचार्यांसाठी आणली गेली. 2009 मध्ये हे सर्व प्रकारच्या लोकांसाठी उघडले गेले. कोणत्याही व्यक्ती आपल्या आयुष्यात नियमितपणे पेन्शन खात्यात योगदान देऊ शकते. (know the best investment plan for more returns, where the money will be safe and will be tax deductible)
पीपीएफ खाते म्हणजे काय?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ खाते, लहान बचतीतून अधिक पैसे जमा करण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये आयकर कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत सूट मिळते. ही एक हमी दिलेली परतावा गुंतवणूक आहे.
एनपीएस खात्याची वैशिष्ट्ये
एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन सिस्टम(NPS – National Pension System) ही पीएफआरडीएद्वारे संचालित योजना आहे. यात इक्विटी एक्सपोजर आहे. वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एकरकमी रक्कम देखील मिळते. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी त्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षे असावे. एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. प्रथम टियर-1 आणि दुसरा टियर-2 या योजनेत एक हजार रुपये देऊन खाते उघडता येते.
पीपीएफ आणि एनपीएसमधील फरक
जर एखाद्या व्यक्तीने एनपीएसमध्ये 100 रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 10 टक्के पर्यंत परतावा मिळेल. पीपीएफमध्ये 100 रुपये जमा केल्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक परतावा मिळेल. त्यामुळे एनपीएसमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे कारण यामध्ये पीपीएफपेक्षा 2.9 टक्के अधिक नफा मिळतो. त्याचप्रमाणे पीपीएफ कॅल्क्युलेटर अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने दरमहा 1.5 लाख रुपये किंवा 12,500 रुपये पीपीएफ खात्यात जमा केले आणि त्याला 7.1 टक्के परतावा मिळाला. तर 30 वर्षानंतर, त्याची परिपक्वता रक्कम 1,54,50,911 रुपये होईल.
एनपीएसमध्ये जर एखादी व्यक्ती दरवर्षी 1.5 लाख रुपये किंवा 12,500 रुपये मासिक ठेवीवर ठेवते आणि एन्युटी 40 टक्के ठेवले तर तो 1,70,94,940 रुपये काढू शकेल आणि उर्वरित 1,13,96,627 रुपयांमधून त्याला दरमहा जवळ जवळ 56,983 रुपये पेंशन मिळेल. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही थोडा धोका पत्करला तर पीपीएफपेक्षा एनपीएसमध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. (know the best investment plan for more returns, where the money will be safe and will be tax deductible)
PHOTO | पाहताक्षणी प्रेमात पडला, एकाच भेटीने दोघांचं आयुष्य बदललं, दिग्गज खेळाडूची अनोखी प्रेमकहाणीhttps://t.co/M1klRk78zs#JPDuminy #SurDuminy #Modelling #Cricketer #Lovestory #CricketerLovestory
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2021
इतर बातम्या
भाजप कार्यकर्त्यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये राडा, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली
‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती’, नितीन गडकरींचं भाजप नेते, कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन