आईच्या अंत्यसंस्काराला जाताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
कोल्हापूर : आईच्या अंत्यसंस्काराला जाताना भीषण अपघात होऊन, दोघांचा मृत्यू झाला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात सून आणि नातू जागीच ठार झाले. तर मुलगा जखमी आहे. अल्टो कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यातील गावठाण […]
कोल्हापूर : आईच्या अंत्यसंस्काराला जाताना भीषण अपघात होऊन, दोघांचा मृत्यू झाला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात सून आणि नातू जागीच ठार झाले. तर मुलगा जखमी आहे. अल्टो कार झाडावर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेमुळे गडहिंग्लज तालुक्यातील गावठाण गावातील नांदवडेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नांदवडेकर यांच्या आईचा मृत्यू झाल्याने ते अंत्यसंस्कारासाठी गडहिंग्लजमधील गावठाण गावाकडे निघाले होते. पुण्याहून कारने ते गावी जात होते. त्यावेळी हरळी गावाजवळ त्यांची कार झाडावर आदळी. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सून वासंती नांदवडेकर आणि नातू सोहम यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे गावठाण या गावातील नांदवडेकर कुटुंबावर काळाने घाला घातला. पुण्याहून नांदवडेकर कुटुंब गावी येताना ही दुर्घटना घडली.