Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात ‘बडा मासा’ एसीबीच्या जाळ्यात, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त लाच घेताना रंगेहाथ

कोल्हापुरातील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे यांनी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पूरग्रस्तांकडून लाच घेतल्याचा आरोप आहे

कोल्हापुरात 'बडा मासा' एसीबीच्या जाळ्यात, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त लाच घेताना रंगेहाथ
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 8:54 AM

कोल्हापूर : दोन लाख रुपयांची लाच घेताना कोल्हापुरात ‘बडा मासा’ एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. (Kolhapur Fisheries Development Officer caught red handed by ACB while taking bribe)

मूळ सोलापूरचे असलेले 45 वर्षीय प्रदीप सुर्वे हे कोल्हापुरात मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मत्स्य उत्पादकाला शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी सुर्वे यांनी लाच मागितल्याची माहिती आहे.

अतिवृष्टीमुळे जलाशयातील मासे आणि मासे उत्पादन करण्यासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्याबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेली पूरग्रस्तांसाठीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रदीप सुर्वे तक्रारदाराकडून लाच घेत असल्याचा आरोप आहे. कोल्हापुरात 2019 मध्ये झालेल्या महापुरात संबंधित तक्रारदाराचं मोठं नुकसान झालं होतं.

भरपाई मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांचा हप्ता प्रदीप सुर्वे स्वीकारत होते. त्यावेळी रमण मळा येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. कोल्हापुरात मत्स्य व्यवसाय कार्यालयातील लाचखोरीतील बडा मासा पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात सापडल्याचे बोलले जाते.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरात 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तक्रारदाराच्या जलाशयातील मासे आणि मासे उत्पादनासाठी लावलेल्या जाळ्या वाहून गेल्या होत्या. महसूल विभागाने तक्रादाराच्या संस्थेच्या जलाशयाचा पंचनामा केला होता. त्यानुसार नुकसान भरपाईचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्सविभाग कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला.

राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर त्यांना 26 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. ती सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाच्या खात्यावर जमा झाली. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुर्वे यांनी एकूण नुकसान भरपाई पैकी 40 टक्के म्हणजे दहा लाख रुपयांच्या रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे. (Kolhapur Fisheries Development Officer caught red handed by ACB while taking bribe)

लाच न दिल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही असे सुर्वे यांनी सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला. तडजोडीत ही रक्कम पाच लाखांवर आली, तर दोन लाखांचा पहिला हप्ता गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधिताने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या :

सलग 75 रविवार स्वच्छता मोहिमांचा धडाका, कोल्हापूरचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली

(Kolhapur Fisheries Development Officer caught red handed by ACB while taking bribe)

'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्...
'तनिषाची मृत्यूनंतर बदनामी', भिसे कुटुंबीयांचं चाकणकरांना पत्र अन्....
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका
पंतप्रधान 2025 चा काळ पूर्ण करतील का यावर मला शंका, राऊतांची टीका.
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी
'त्यांचा घराचा पत्ता काढणार आणि घरी येऊन...', सोमय्यांना FB वरून धमकी.
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.