कोल्हापूर : मायक्रोफायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांचे (Kolhapur Flood affected women protest) आंदोलन आणखी चिघळले. आंदोलक महिलांनी थेट पंचगंगा नदीत उड्या मारल्या. पूरग्रस्त महिलांनी (Kolhapur Flood affected women protest) थेट नदीत उड्या घेऊन आंदोलन केलं. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासमोरच नदीत उड्या घेतल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. छत्रपती शासन संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं.
या महिलांनी गेल्या तीन दिवसांपासून पंचगंगा नदीत आंदोलन सुरु केलं आहे. मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक महिलांचं निवेदन स्वीकारण्यासाठी खासदार धैर्यशील माने आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी महिलांनी थेट नदीत उड्या घेत आंदोलन केलं.
यावेळी उपस्थित पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. खासदार धैर्यशील माने स्वत:ही पाण्यात उतरुन आंदोलक महिलांना बाहेर येण्याचं आवाहन करत होते. शिवाय पोलिसांनीही पाण्यात उतरुन महिलांना नदीबाहेर आणलं.
दरम्यान, याच महिलांनी गेल्या महिन्यातही आंदोलन केलं होतं. त्यावेळी महिलांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर आंदोलन केलं. हायवेवर चूल मांडून महिलांनी पूरग्रस्तांना (Kolhapur Flood affected women protest) न्याय देण्याची मागणी केली. महिलांनी अक्षरशः संसार थाटत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला होता.
संबंधित बातम्या
कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांनी हायवेवर चूल मांडली, पुणे-बंगळुरु हायवेवरच ठिय्या