Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Flood | 2 लाख घरात वीज नाही, मोबाईल नेटवर्क गायब, हवाईमार्गे इंधन पुरवठ्याची तयारी

पंचगंगेची पाणी पातळी 2 फुटांनी घटली आहे.  सध्या पाणी पातळी 53 फुटांवर आली आहे. मात्र तरीही ती धोकापातळीपेक्षा 10 फुटांनी जास्त आहे. बचाव पथकांकडून आजही मदत आणि बचावकार्य सुरुच आहे.

Kolhapur Flood | 2 लाख घरात वीज नाही, मोबाईल नेटवर्क गायब, हवाईमार्गे इंधन पुरवठ्याची तयारी
Follow us
| Updated on: Aug 09, 2019 | 10:24 AM

Kolhapur flood कोल्हापूर  : कोल्हापूर-सांगलीकरांना (Sangli flood) पुराच्या पाण्याने वेढा देऊन आठवडा होत आहे. प्रचंड पावसाने नद्यांनी पात्रं सोडली आहेत, त्यातच धरणं भरल्याने त्यातून होणाऱ्या विसर्गाने पूर हटण्याचं नाव घेत नाहीय. दिलासादायक बाब म्हणजे काल रात्री पंचगंगेची पाणी पातळी 2 फुटांनी घटली आहे.  सध्या पाणी पातळी 53 फुटांवर आली आहे. मात्र तरीही ती धोकापातळीपेक्षा 10 फुटांनी जास्त आहे. बचाव पथकांकडून आजही मदत आणि बचावकार्य सुरुच आहे.

LIVE UPDATE

  • कोल्हापुरात धरण क्षेत्रात पुन्हा सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये पुन्हा वाढ होण्याची भीती आहे. पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस असाच पाऊस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
  • महापुरामुळे महामार्गावर अडकलेल्या वाहनांना सरकार टोल माफी देणार,खात्रीलायक सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती,आज दुपारपर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं, महापुरामुळे पुणे – बंगलोर महामार्गावर सध्या चार हजारांपेक्षाही जास्त वाहनं अडकून

लाखो लोकांचं स्थलांतर

एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील  अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडीमधील 99 टक्के तर प्रयाग चिखली मधील 85 टक्के कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. सध्या 53.5 फूट इतकी पातळी झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये 30 बोटी पाठविण्यात आल्या असून आज 151 शिबीरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली.

वाचा : Kolhapur Flood | अंत्यसंस्काराला जागा नाही, वृत्तपत्र छापायला वीज नाही, कोल्हापूरच्या पूरस्थितीचे थरकाप उडवणारे 7 मुद्दे 

पाणी पातळी आणखी कमी झाल्यानंतर या गावांमध्ये हा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणी ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरांचे, जनावरांचे पंचनामे करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. वीज जोडणी करणे, पाणी पुरवठा करणे, जनावरांना चारा पुरवठा करणे याचाही समावेश आहे.

आजअखेर आपल्याकडे 69 हजार लिटर पेट्रोल, 31 हजार लिटर डिझेलचा राखीव साठा करण्यात आला आहे. हा साठा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वाहनांसाठी केला जात आहे. नागरिकांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. दोन दिवसांमध्ये महामार्गावरील पाणी कमी झाल्यानंतर लागलीच इंधन पुरवठा करावा अशा सूचना दिल्या आहेत.

पाणी कमी न झाल्यास हवाई मार्गाने इंधन आणण्यात येईल त्याबाबत तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. महामार्ग सुरु झाल्यानंतर तात्काळ नागरिकांना उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मोबाईल सेवा कोलमडल्या आहेत त्याबाबतही कंपन्यांना पत्र दिले आहे. ते ही सुरळीत सुरु होईल.

प्राथमिक माहितीनुसार 2 लाख घरांमध्ये विद्युत पुरवठाही बंद आहे. जवळपास 400 पाणी पुरवठा योजना बंद आहेत. याबाबतही सूचना देण्यात आल्या असून त्या ही पूर्ववत होतील. असेही ते म्हणाले.

तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे – कागल – 25 गावातील 1 हजार 73 कुटुंबातील 5 हजार 542 सदस्य, राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123 कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 8 हजार 211 कुटुंबातील 39 हजार 550 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 4 हजार 484 कुटुंबातील 21 हजार 122 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 40 कुटुंबातील 23 हजार 317 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516 सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.

संबंधित बातम्या  

येडियुरप्पा आणि फडणवीसांना फोन, पूर हटवण्यासाठी कोल्हापूरचे जावई सक्रिय   

Sangli Boat Overturn | सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू 

Kolhapur Flood Live : कोल्हापूर-सांगली अद्याप पाण्यात, इंधनाचा तुटवडा, मुख्यमंत्री पाहणी करणार   

सांगलीतील महापुरामुळे कैदी कारागृहात अडकले, शाळेत स्थलांतर करताना दोघे पळाले    

Sangli Boat Overturn | काईलीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले, घटनास्थळी काय घडलं? 

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.