कोल्हापूर : इचलकरंजी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी असलेल्या गायत्री मोबाईल (Ichalkaranji Mobile Shop Robbed) दुकानाचे लोखंडी शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यामध्ये विविध कंपनींचे 107 मोबाईल असा एकूण 16 लाख 66 हजार 323 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही चोरीची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. याबाबतची तक्रार रवी जनार्दन हजारे (वय 34) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे (Ichalkaranji Mobile Shop Robbed).
रवी हजारे यांचे बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी गायत्री मोबाईल शॉपी नावाचे मोबाईल दुकान आहे. चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप तोडून लोखंडी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. शॉपमध्ये असणारे बॉक्स फोडून त्यातील मोबाईल लंपास केले.
दरम्यान, चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, ते घटनास्थळीच घुटमळले. दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरी करुन एका खासगी रिक्षातून हे चोरटे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आठ अज्ञात चोरटे दिसून आले असून, पोलिसांना गुंगारा देत सर्वजण वेगवेगळ्या दिशेने पलायन केले. हे चोरटे स्थानिक नसून अट्टल चोरटे असल्याची चर्चा सुरु होती. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांनी भेट दिली.
नागपुरात 41 लाखांची ऑनलाईन फसवणूक, चार नायजेरियनसह एका भारतीयाला अटकhttps://t.co/l2jEJ3mut6@NagpurPolice #NagpurCrime #CyberCrime
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2020
Ichalkaranji Mobile Shop Robbed
संबंधित बातम्या :
Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले
पुण्यातील सराफाची दुकाने फोडणारी टोळी गजाआड; एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त