आंतरजिल्हा बदलीच्या सॉफ्टवेअरमध्ये शून्यबिंदू नामवलीचा समावेश करा, कोल्हापूरच्या बदली संघर्ष समितीची मागणी
चौथ्या टप्प्यातील सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा अशी मागणी कोल्हापूरच्या आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने केली (Kolhapur Inter-district Transfer Committee) आहे.
कोल्हापूर : आंतरजिल्हा बदलीच्या चौथ्या टप्प्यातील सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा अशी मागणी कोल्हापूरच्या आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. तसेच या सॉफ्टवेअरमध्ये शून्यबिंदू नामवलीचा समावेश करावा अशीही विनंती त्यांनी केली आहे. (Kolhapur Inter-district Transfer Committee various demand to Minister Hasan Mushrif) या बदली संघर्ष समितीने हसन मुश्रीफ यांच्याकडे आपलं निवेदन दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी पुढील मुद्दे मांडले.
1. गेल्या 3 टप्प्यात खुला प्रवर्ग आणि कोकणातील बदल्या अतिशय कमी प्रमाणात झाल्या. हा एकप्रकारे या समूहावर मोठा अन्याय झाला.
2. आपण अभ्यासगट नेमून त्यावर कार्यवाही करण्याचे ठरवले. त्यानुसार पुणे येथे 5 ceo च्या मार्गदर्शनाखाली विचार विनिमय सभा संपन्न झाली.
3. या सभेत सुमारे 40 राज्यस्तरीय संघटना सहभागी होत्या. या सर्वांच्या अजेंड्यावर शून्यबिंदूनामावली हा विषय अग्रभागी राहिला. तशी निवेदने ही शासनाला सादर करण्यात आली.
4. वरील सर्व संघटनांच्या माहिती स्वीकारून सॉफ्टवेअर मध्ये तसा बदल करावा अशी नम्र विनंती.
5. या शून्यबिंदूनमावलीचा वापर यापूर्वी करण्यात आला आहे. 2014 मध्ये वस्तीशाला शिक्षकांना कायम करताना त्यांच्या स्वजिल्ह्यात सामील करून घेतले. याबाबतचा शासन निर्णय 1 मार्च 2014 रोजी जाहीर झाला.
6. या शासन निर्णयानुसार ज्या प्रवर्गाच्या बिंदू उपलब्ध नसेल त्यांना बिंदूनामावलीच्या शेवटी अद्याप स्थान प्राप्त न झालेले उमेदवार [थोडक्यात अतिरिक्त उमेदवार] असे म्हणून स्थान देण्यात आले. खुल्या उमेदवारांना ही असेच स्थान प्राप्त करून दिले गेले. (Kolhapur Inter-district Transfer Committee various demand to Minister Hasan Mushrif)
7. तसेच भविष्यात त्यांच्या स्वत: च्या प्रवर्गात जागा निर्माण झाल्याने त्यांना मूळ बिंदू वर घेण्यात आले. हा बिंदू सेवानिवृत्ती, मयत, स्वेच्छानिवृत्ती पदोन्नती इत्यादी मार्गानी उपलब्ध करून दिला गेला .
8. बीड जिल्ह्यात ही अतिरिक्त शिक्षक असताना आंतरजिल्हा बदलाने गेलेल्या शिक्षकांना जागा नसताना सामावून घेतले गेले. त्यांचा बिंदू भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांवर सामावून घेण्यात आला. माजी ग्रामसचिव यांनी याबाबतचे पत्र दि. 27-11-2018 रोजी दिले.
9. तेव्हा वरील बाबींचा विचार करून आंतरजिल्हा बदलीचा गंभीर प्रश्न शिक्षक अतिरिक्त असतानाही सोडवला गेला.
10. या शून्य बिंदूनामावलीचा वापर केल्याने कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होत नसून अनेक जिल्यातील अतिरिक्त शिक्षक असताना आंतरजिल्हा बदल्या शक्य आहेत.
11. या शून्यबिंदूनामावलीचा वापर केल्याने सर्व संवर्गाना लाभ मिळेल आणि त्यांची सेवाजेष्ठता ही टिकेल. उदा. पती पत्नी एकत्रीकरण, एकल बदली, अपंग दुर्धर आजार इ….
12. खुल्या प्रवर्गातील आणि कोकणातील अनेक शिक्षक गेल्या 14 – 15 वर्ष घरापासून दूर राहून शैक्षणिक सेवा देत आहेत. त्यांचे मानसिक स्वास्थ हरवले आहे. त्यांना शून्यबिंदूचा वापर करून न्याय देणे योग्य राहील.
13. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन वस्तीशाला शिक्षकांप्रमाणे आंतरजिल्हा बदलीग्रस्ताना न्याय देण्यात यावा. तसा सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात यावा अशी विनंतीही कोल्हापूरच्या आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने यांनी केली आहे. (Kolhapur Inter-district Transfer Committee various demand to Minister Hasan Mushrif)
संबंधित बातम्या :
Railway Privatization | भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार
नितीन गडकरींचा चीनला दणका, महामार्गांची कामं चिनी कंपन्यांना नाही