सांगली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र मूळ कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघा आरोपींवर बलात्कार आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Kolhapur Lady Gang Rape in Miraj)
मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणीवर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बलात्कार झाल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्ती दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे.
मिरज रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास 19 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मागील काही दिवसापासून मिरजमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती.
बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या महिन्यापासून सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा असताना मोकळ्या जागेत बलात्काराच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : मुंबईत लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांड, सख्ख्या भावांची हत्या, एक गंभीर
दरम्यान, घरगुती हिंसाचार, अत्याचार किंवा मानसिक छळ सहन करावा लागणाऱ्या महिलांना मदतीसाठी 100 हा हेल्पलाइन नंबर असल्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करुन दिली होती.
मदतीसाठी आणखी दोन हेल्पलाइन नंबर
मुंबई महापालिका आणि बिर्ला – 1800 1208 200 50
आदिवासी विभाग- 1800 102 4040
आदिवासी विभागासोबत प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लही सहभागी
(Kolhapur Lady Gang Rape in Miraj)
मुंबईतही गुन्हेगारी सुरु
लॉकडाऊन असतानाही दोन दिवसांपूर्वी मुंबईत दुहेरी हत्याकांड घडलं होतं. शिवडीमध्ये दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.
मैदानात बसलेल्या मुलांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन होता.
VIDEO | Special Report | कोरोना नियंत्रणाचं ‘वरळी मॉडेल’ https://t.co/Qn2ArLa1WD
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2020