Kolhapur Lockdown | जिल्हाधिकाऱ्यांचे फेरआदेश, कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या नियमात बदल

लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

Kolhapur Lockdown | जिल्हाधिकाऱ्यांचे फेरआदेश, कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनच्या नियमात बदल
Follow us
| Updated on: Jul 19, 2020 | 7:11 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून (सोमवार 20 जुलै) सात दिवस कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेर आदेश काढत जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या नियमात काही बदल केले आहेत. (Kolhapur Lockdown Guidelines and Rules Changed)

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील सोमवार ते रविवार असे सात दिवस कडक लॉकडाऊन आहे. मात्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार ग्रामीण भागातील एमआयडीसी, सहकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. बँकेची मुख्य कार्यालयेही सुरु राहणार आहेत. तर दूध संकलन आणि विक्री पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, रायगड, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

कोल्हापूरमध्ये लॉकडाऊनपूर्वीची गटारी

कोल्हापूरमध्ये मटण मार्केटसह ठिकठिकाणच्या मटण दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या. आधीच गटारी, त्यात उद्यापासून पुढचे सात दिवस जिल्हा लॉकडाऊन असल्याने गर्दीत वाढ दिसली. (Kolhapur Lockdown Guidelines and Rules Changed)

सतेज पाटील यांचे आवाहन

“कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया”, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.

संबंधित बातम्या :

Raigad Lockdown | रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन, अदिती तटकरे यांची घोषणा

Pune Lockdown Rules | पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर, काय सुरु काय बंद?

(Kolhapur Lockdown Guidelines and Rules Changed)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.