संजय राऊत यांची अवस्था कुत्र्याप्रमाणे…; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल

Naresh Mhaske on Sanjay Raut : संजय राऊतांचा थोडा जरी मेंदू शिल्लक असेल तर...; शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दाखला देत नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. वाचा सविस्तर...

संजय राऊत यांची अवस्था कुत्र्याप्रमाणे...; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 1:26 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : संजय राऊत यांचा थोडा आपला मेंदू आता शिल्लक राहिला असेल, तर त्याला चालना द्यावी. शिवसेना ही काँग्रेसच्या विरोधात उभी राहिली आहे. काँग्रेसच्या ध्येयधोरणांविरोधात शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांचा वाक्य होतं की मला जर काँग्रेस सोबत जावं लागलं तर मी माझं दुकान बंद करेन. परंतु यांनी भाजपसोबत निवडणुका लढल्या आणि नंतर काँग्रेस सोबत आणि शरद पवार यांच्यासोबत गेले. खुर्चीसाठी महाविकास आघाडी केली. ज्याप्रमाणे दाराबाहेर कुत्र आलं तर त्याला कोण हड्डी टाकतो आणि ते हड्डी घेऊन कुत्रं निघून जातो. तशी परिस्थिती संजय राऊत यांचे झाली होती, असं म्हणत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

राऊतांवर हल्लाबोल

संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दाराबाहेर उभे राहत होते. याला चाटूगिरी म्हणायची की आणखी काय म्हणायचं हे संजय राऊत यांना विचारलं पाहिजे. केवळ सत्ता मिळावी म्हणून ते त्यांच्या घराबाहेर उभे होते, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनावेळी म्हस्के यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.

नरेश म्हस्के यांचा ठाकरे गटावर शाब्दिक हल्ला

महाबळेश्वर येथील अधिवेशन आपण पाहिलं होतं त्यामध्ये कोणालातरी पक्षप्रमुख करण्याकरिता ते अधिवेशन घेतला होता. परंतु हे अधिवेशन संघटना बांधण्यासाठी करत आहोत. पक्षप्रमुख तुम्ही लोकांवर लादले. आम्ही हे अधिवेशन सरकारचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहोत. हा दोन अधिवेशन मधला फरक आहे. अदनीं वरोधात संजय राऊत स्टेटमेंट करत आहेत. तर त्यांनी शरद पवार यांची परवानगी घेतली आहे का हे त्यांना विचारा… एकीकडे अदानी विरोधात बोलतात आणि नंतर पवार जाऊन अदानी यांना भेटतात…, असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

ठाकरे गटाकडे आम्ही कशाला बघू? उद्या ठाणे पालघर आसपासच्या परिसरात साद घातली जाणार आणि सांगणार या बाबा आम्हाला वाचवा. गर्दी दाखवणार.. झगा मगा आणि माझ्याकडे बघा अशी परिस्थिती त्यांची आहे. उरलेले सुरलेले ठाणेकर हे त्यांच्याकडे टिकवण्यासाठी हा दौरा आहे, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.