आदित्य- उद्धव ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी…; शिंदे गटातील मंत्र्यांचं मोठं विधान

Shambhuraj Desai on Aditya Thackeray And Uddhav Thackeray : शिंदे गटातील नेत्याचं आदित्य- उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र... कोल्हापुरात शिवसेनेचा महामेळावा होत आहे. महामेळाव्यात बोलताना त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. नेमकी काय टीका करण्यात आलीये? वाचा...

आदित्य- उद्धव ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी...; शिंदे गटातील मंत्र्यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 3:35 PM

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटचं महा अधिवेशन होत आहे. इथं बोलताना महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी एकनाथ शिंदे यांचा बाल सुद्धा वाकडा होणार नाही. त्यांनी कितीही टीका केली तरी काहीही होणार नाही. कारण जनता आमच्या पाठीशी आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले.

ठाकरेंवर निशाणा

आधी कल्याणमध्ये त्यांनी दौरा केला. तेव्हा 170 माणसा तिथे होती आणि दुसऱ्या ठिकाणी 300 च्या आसपास माणसं होती. तिसऱ्या ठिकाणी 500 साडेपाचशे लोक आले होते. त्यांना वाटतं रोज रोज आल्याने संख्या वाढेल. पण संख्या कमी झाल्याचा अनुभव त्यांना मिळेल.उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यात मुक्कामाला जरी आले तरी एकनाथ शिंदे यांचा बाल सुद्धा वाकडा होणार नाही, असं शंभुराज देसाई म्हणाले.

संजय राऊतांवर टीकास्त्र

संजय राऊत यांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही. त्यांना दुसरं काही काम नाही. एवढा मोठा महा अधिवेशन त्यांना कधी घेता आलं नाही. असं अधिवेशन त्यांनी कधी घेतलं हे त्यांनी सांगावं. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात असं कधी कोणाला बोलता आलं का? हे सामान्य शिवसैनिकाचे महा अधिवेशन आहे, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे देशाने स्वीकारलं आहे. महत्त्वाचे निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतले. जागतिक मान्यता प्राप्त असणारा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. चांगल्याला वाईट म्हणण्याचं हे संजय राऊत यांचं असू शकतं. संजय राऊत यांचा संविधानावर विश्वास आहे ना? संजय राऊत खासदार झाले होते ते आमच्या मतावर…, असा टोलाही शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.