Konkan Ganeshotsav | रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान

रत्नीगिरीत गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही जिल्ह्यात येता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Konkan Ganeshotsav | रत्नागिरीत ई-पासशिवाय नो एंट्री, जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान
Follow us
| Updated on: Aug 02, 2020 | 5:44 PM

रत्नागिरी : रत्नीगिरीत गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येण्यासाठी (Ratnagiri E-Pass Compulsion) पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही जिल्ह्यात येता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या असून घाटात वादाचे प्रसंग घडत आहेत (Ratnagiri E-Pass Compulsion).

खेड येथे खोटा पास असलेल्या वाहनाला पकडण्यात आले. मात्र, सध्या तरी विनापास जिल्ह्यात येण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात पास शिवाय कुणालाही प्रवेशाची परवानगी नाही असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत काही वाहिन्यांवर चुकीचे वृत्त प्रसारित होत आहे, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केलं आहे.

गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी चौदा दिवस क्वारंटाईन

गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढला आहे. जिल्ह्याची सीमा असलेल्या खारेपाटन चेकपोस्टवर जिल्हा प्रशासनाकडून चाकरमान्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारुन प्रवेश दिला जात आहे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी ठेवला आहे. ज्या चाकरमान्यांचं घर वस्तीपासून लांब आहे, अशांना होम क्वारंटाईन केलं जात आहे. तर बाकीच्यांना गावातील शाळांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गावातील कोरोना ग्राम सनियंत्रण समिती देखरेख करत आहे.

येणाऱ्या चाकरमान्यांमुळे गावातील लोकाचं आरोग्य धोक्यात येऊ नये, कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी 14 दिवस क्वारंटाईन राहवच लागेल, अशी अटच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी घातली आहे. तसेच, शासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थीचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन कोरोना ग्राम सनियंत्रण समितीने केलं आहे (Ratnagiri E-Pass Compulsion).

कोकणाताली गणोशोत्सवाशी संबंधित महत्वाच्या घडामोडी

– कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गणोशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात ई-पास शिवाय प्रवेश नाही. चाकरमान्यांना विनापास येण्यास परवानगी नाही.

– चाकरमान्यांनी 5 आॉगस्टच्या आधी गावी पोहोचण्याचा निर्णय मागे घ्यावा. 14 दिवासाचं क्वारंटाईन चुकीचं आहे, असं माजी आमदार आणि रायगडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिकराव जगपात म्हटलं. जवळपास 14 दिवस कोकणात क्वारंटाईन व्हावं आणि नंतर मुंबईत, म्हणजेच जवळपास महिनाभर क्वारंटाईन राहण्यात जाईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

– विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा खारपाडा तपासणी नाक्याला भेट दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या व्यवस्थेची माहिती घेतली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासासाठी ताटकळत रहावे लागणार नाही, यांची काळजी घेतली जावी, प्रवास सुरळित होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रवीण दरेकर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

Ratnagiri E-Pass Compulsion

संबंधित बातम्या :

Ganeshotsav 2020 | परवानगीशिवाय मंडपाची उभारणी केल्यास कारवाई, नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून सार्वजनिक गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना

Konkan Ganeshotsava | चाकरमान्यांसाठी खुशखबर, गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.