‘ही’ पॉप स्टार कधीही आई बनू शकणार नाही

लॉस एंजलिस (यूएसए) : प्रसिद्ध पॉप स्टार कायली मिनोगने सध्या स्तन कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या आजाराने कायली मिनोगकडून आई बनण्याचे सुख हिरावून घेतलं आहे. कायली आता पुन्हा कधीही आई होऊ शकणार नसल्याने तिचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. कायली मिनोगला 36 वर्षाची असताना म्हणजेच 2005 मध्ये स्तन कन्सर झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून […]

'ही' पॉप स्टार कधीही आई बनू शकणार नाही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

लॉस एंजलिस (यूएसए) : प्रसिद्ध पॉप स्टार कायली मिनोगने सध्या स्तन कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या आजाराने कायली मिनोगकडून आई बनण्याचे सुख हिरावून घेतलं आहे. कायली आता पुन्हा कधीही आई होऊ शकणार नसल्याने तिचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.

कायली मिनोगला 36 वर्षाची असताना म्हणजेच 2005 मध्ये स्तन कन्सर झाला होता. गेल्या अनेक वर्षापासून तिच्या या आजारावर उपचार सुरु होते. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी तिला तू कधीही आई बनू शकत नाही ही गोष्ट सांगितली. यानंतर कायलीला मानसिक धक्का बसला. या धक्क्यातून सध्या कायली स्वत:ला सावरत आहे.

मी कधीही आई होऊ शकणार नाही असा विचारही मी केला नव्हता. पण स्तन कन्सरमुळे माझे सर्व आयुष्य बदलून गेले. मी कधीही आई होऊ शकणार नाही याचे मला दु:ख आहे. एक स्त्री म्हणून आई होण्याचे सुख काय असते, याचा मी नक्कीच विचार करु शकते. आता माझे वय 50 वर्षे आहे. त्यामुळे मी कधीही आई होऊ शकणार नाही याचा मी स्विकार केला आहे, असं कायली मिनोग म्हणाली.

“आई न होणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दु:ख आहे. पण हीच गोष्ट मनात ठेवली, तर मला पुढे जाता येणार नाही, असेही कायली म्हणाली”.

कोण आहे कायली मिनोग ?

कायली मिनोग एक प्रसिद्ध पॉप स्टार आणि अभिनेत्री आहे. कायली ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. 1987 पासून कायली संगीत क्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत अनेक गाणी कायलीची प्रसिद्ध झाली आहे. ‘ऑल द लव्हर्स’ आणि ‘इनटू द ब्ल्यू’ गाणी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.