नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (LAC Face off Live Updates)
चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.
देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. त्यापूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.
LAC Face off Live Updates
PM Modi on Ladakh face-off | जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, उत्तर देण्यास भारत सक्षम : पंतप्रधान मोदी https://t.co/XZo4OZ5sOk
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2020
India China Face off | पंतप्रधानांकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा https://t.co/2OUq4Bjewv #NarendraModi #indiachinastandoff
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2020
चीनची गुरगुर सुरुच, भारतानं रुळावर यावं, गलवान आमचंच, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं, LAC वर भारतानेच चिथावल्याचा कांगावा, भारतासोबतच्या संघर्षावर चीनची अधिकृत प्रतिक्रिया https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/WsPzg8LYs1
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2020
Commanding Officer of the Chinese Unit involved in the face-off with Indian troops in the Galwan Valley among those killed: Sources confirm to ANI pic.twitter.com/MWbEUZezba
— ANI (@ANI) June 17, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतापुढे आता कोणते मार्ग असतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे. (LAC Face off Live Updates)
भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off 20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.
गलवान खोरे क्षेत्र महत्त्वपूर्ण का आहे?
“गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं”, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?