साडेचार वर्षांपासून वरसावे गावातील सार्वजनिक तलाव चोरीला
सार्वजनिक ठिकाणची वाहने, वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत (Lake theft in Mira Bhayandar) असतात.
ठाणे : सार्वजनिक ठिकाणची वाहने, वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडत (Lake theft in Mira Bhayandar) असतात. परंतू मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील वरसावे गावातील चक्क सार्वजनिक तलावच चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांकडून या तलावाचा शोध घेण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून होत आहे. मात्र सरकारी यंत्रणेकडून त्यांच्या तक्रारीची दखलच घेण्यात (Lake theft in Mira Bhayandar) आलेली नाही.
मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वरसावे गाव आहे. या वरसावे गावातील तलावच चोरीला गेला आहे. वरसावे गावातील सर्वे क्रमांक 90 मधील 8 गुंठे ही जागा सार्वजनिक तलाव असल्याची नोंद महसूल विभागात आहे.
गावातील रहिवासी आणि विशेष करुन आदिवासी अनेक वर्षांपासून या तलावाचा वापर करत होते. मात्र गेल्या चार वर्षांपासून तलाव दिसेनासा झाला आहे. सार्वजनिक तलाव अथवा नैसर्गिक नाले बुजविण्यास मनाई असतानाही वरसावे गावातील या तलावात बेधडकपणे माती भराव करुन तो बुजविण्यात आला आहे.
तलाव एप्रिल 2016 रोजी चोरीला गेला आहे. तेव्हापासून याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी, महसूल विभागाकडे तसेच काशिमिरा पोलीस ठाण्यात केल्या आहेत. या तलाव हरवल्याच्या प्रकरणाची तलाठ्यामार्फत चौकशी करुन चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चोरीला गेलेला हा तलाव परत मिळावा यासाठी ग्रामस्थ गेल्या चार वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु सरकारी यंत्रणांनी त्यांना दाद दिलेली नाही. संबंधित विभागाकडे याची माहिती नेल्याचं प्रयत्न केले. परंतु कॅमेरासमोर कोणी बोलायला तयार नाही.