अफवा पसरवणारे मूर्खपणा करत आहेत : लता मंगेशकर
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आपली प्रकृती उत्तम असून मी घरीच आहे आणि ठणठणीत आहे, असं खुद्द लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे मेसेज फिरत आहेत. त्यातच आज त्यांना त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही मेसेज फॉरवर्ड […]
मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र आपली प्रकृती उत्तम असून मी घरीच आहे आणि ठणठणीत आहे, असं खुद्द लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं. अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याचे मेसेज फिरत आहेत. त्यातच आज त्यांना त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही मेसेज फॉरवर्ड होत आहेत. मात्र लतादीदींनी आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं.
माझ्या प्रकृतीबाबतच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत, त्यावर विश्वास ठेऊ नका, असं लता मंगेशकर यांनी टीव्ही 9 ला सांगितलं.
लतादीदी म्हणाल्या , “माझी प्रकृती चांगली आहे, ठणठणीत आहे, घरी बसलेय. माझी प्रकृती छान आहे, मी काही आजारी नाही. मला या अफवांचं वाईट वाटत नाही, कारण याआधी पण अशा अफवा उठल्या. अफवा पसरवणारे काहीतरी आचरटपणा करत असतात. त्यांना हे करण्यात मजा येते. एक बातमी उडवली आणि सगळ्यांना हलवून सोडलं, असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे कळत नाही की आपण मूर्खपणा करतोय. अशा अफवा उठतात तेव्हा चाहत्यांना वाईट वाटतं आणि त्यांना वाईट वाटावं म्हणूनच अशा अफवा उठवल्या जातात. पण अफवा उठवणाऱ्यांना हे कळत नाही की, असं जर त्यांच्या बाबतीत झालं तर काय होईल.”
“माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका, माझी प्रकृती ठीक असून मी माझ्या घरी आहे.” असे ट्वीट लता मंगेशकर यांनी केले.
Namaskar. Meri sehat ke baare mein kuch afwaahein uth rahi hain Lekin aap in par vishwas na karein. Main bilkul swasth hun aur apne ghar mein hun.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 14, 2018
याआधी लता मंगेशकर या गाणं सोडणार आहेत अशी अफवा पसरवण्यात आली होती, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत गाणं सोडणार नाही असे लता दीदींनी सांगितले होते.