Maharashtra Corona | महाराष्ट्रात नव्याने 5 हजार 229 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णांचा आकडा 83 हजार 859 वर
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या नोंदीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. राज्यात आज (4 डिसेंबर) एकूण 5 हजार 229 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 6 हजार 776 जण कोरोनामुक्त झाले.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या नोंदीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. राज्यात आज (4 डिसेंबर) एकूण 5 हजार 229 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 6 हजार 776 जण कोरोनामुक्त झाले. दुसरीकडे आज दिवसभरात कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रात 127 जणांचा मृत्यूही झाला. आतापर्यंत राज्यात एकूण 18 लाख 42 हजार 587 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 17 लाख 10 हजार 50 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात एकूण 83 हजार 859 सक्रीय रुग्ण आहेत (Latest Corona Updates of Maharashtra 4 December 2020).
महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.81 टक्के झालं आहे. दुसरीकडे आतापर्यंत कोरोनाने महाराष्ट्रात 47 हजार 599 जणांचा मृत्यू झालाय.
राज्यात आज 5229 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6776 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1710050 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 83859 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.81% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 4, 2020
धुळे
धुळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर 7 डिसेंबरला उघडणार आहेत. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील 248 शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. मात्र, 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेल्या गावांमधील शाळा बंदच असणार आहे. शासनाचे निकष पाळणाऱ्या आणि पालकांच्या संमती असलेल्या शाळा सुरु होणार आहे.
वसई विरार
वसई विरारमध्ये मागील 24 तासांमध्ये 62 कोरोना बाधित रुग्ण वाढले. एका कोरोना बधित रुग्णाचा मृत्यूही झाला. याशिवाय 40 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवे 62 रुग्णांसह आता वसई विरार नालासोपारा क्षेत्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 319 झाली आहे. यापैकी एकूण 26 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 867 झाली. उर्वरित केवळ 573 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नागपूर
नागपुरात आज 422 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. नागपूरमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 691 झाली आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 4 हजार 399 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 3 हजार 714 वर पोहचली आहे.
संबंधित बातम्या :
महापरिनिर्वाण दिनी ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे येऊ नये, ग्लोबल पॅगोडा आणि महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती
Latest Corona Updates of Maharashtra 4 December 2020