बिहारमध्ये लग्नसमारंभात फायरिंग, डान्सरचा लाईव्ह मृत्यू
पटना: बिहारमध्ये आनंदाच्या भरात केलेलं फायरिंग एका डान्सरच्या जीवावर उठलं. उत्साहाच्या भरात गोळीबार केल्याने स्टेजवर डान्स करत असलेल्या डान्सरचा गोळी लागून मृत्यू झाला. बिहारच्या सहरसा सोनवर्षा येथील विराटपूर गावात लग्न समारंभात ही धक्कादायक घटना घडली. सुप्रीम कोर्टाने उत्साहात फायरिंग करण्यावर बंदी घातली आहे. मात्र तरीही असे प्रकार घडत आहेत. सहरसा इथे स्टेजवर डान्स करत असलेल्या महिलेला […]
पटना: बिहारमध्ये आनंदाच्या भरात केलेलं फायरिंग एका डान्सरच्या जीवावर उठलं. उत्साहाच्या भरात गोळीबार केल्याने स्टेजवर डान्स करत असलेल्या डान्सरचा गोळी लागून मृत्यू झाला. बिहारच्या सहरसा सोनवर्षा येथील विराटपूर गावात लग्न समारंभात ही धक्कादायक घटना घडली. सुप्रीम कोर्टाने उत्साहात फायरिंग करण्यावर बंदी घातली आहे. मात्र तरीही असे प्रकार घडत आहेत.
सहरसा इथे स्टेजवर डान्स करत असलेल्या महिलेला गोळी लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. स्टेजसमोर अनेक गोळ्यांचे राऊंड फायर करण्यात आले होते. त्यावेळी त्यातील गोळी या डान्सरला लागली आणि तिचा मृत्यू झाला. आकृती सिंह असं मृत महिलेचे नाव आहे. ती सहरसा येथील वास्तू विहार कॉलनीमध्ये आपल्या परिवारसोबत राहत होती.
सहरसा येथील सोनवर्षा येथील विराटपूर गावात लग्न समारंभ होता. या लग्न समारंभात आकृती सिंह या डान्सरला बोलवण्यात आले होते. ती नाचत असताना स्टेज खाली उभे असलेल्या अनेकांनी हवेत फायरिंग करण्यास सुरवात केली. मात्र यामध्ये एक गोळी डान्सरला लागली आणि ती स्टेजवरच कोसळली. यावेळी तातडीने तिला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये मृत डान्सरचा मामा वीजेंद्र प्रसाद सिंह यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
विराटपूर गावात राहणाऱ्या आशिष कुमार सिंहच्या बहिणीचे लग्न होते. या लग्न समारंभासाठी बटराहा येथे राहणारा दिलीप यादव आकृतीला घेऊन गेला होता. यावेळी ती स्टेजवर डान्स करत होती, तेव्हा समोरुन आशिष कुमार आणि त्याच्या मित्रांनी समोरुन बंदुकीतून गोळ्या झाडल्या, असं आकृतीचे मामा वीजेंद्र सिंह म्हणाले.
यावेळी माझ्या भाचीच्या डोक्यात गोळी लागली आणि ती स्टेजवर पडली. या घटनेची माहिती आम्हालाही रात्री उशिरा मिळाली. मात्र तिला रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असं वीजेंद्र सिंह यांनी सांगितले.
लग्नसमारंभावेळी डान्स सुरु होता त्यावेळी अत्यंत भीषण परिस्थिती होती. तिथे अंदाधुंद गोळीबार सुरु होता. त्यांनी 500 राऊंड पेक्षा अधिक गोळ्या चालवणार असल्याचे म्हटले होते, अशी माहिती ऑर्केस्ट्राच्या प्रमुखांनी दिली.
दरम्यान, मृत्यू झालेल्या डान्सरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन आम्ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं सहरसाचे पोलीस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितलं.