Live : ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

| Updated on: Oct 07, 2020 | 3:04 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live :  ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा
Follow us on

[svt-event title=”मी नटींच्या भीडमध्ये नव्हे, कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो : रामदास आठवले ” date=”07/10/2020,3:03PM” class=”svt-cd-green” ] केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आठवलेंनी अभिनेत्री कंगना रनाौतवरुन जाब विचारणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर दिले. आठवले म्हणाले, “मी कंगनाला मानवतेच्यादृष्टीने विचार करुन पाठिंबा दिला. कंगना जे बोलली आहे त्याचे समर्थन नाही. हाथरसमध्ये मी जाऊन आलो, तुम्ही कधी जाणार आहात? मी नटींच्या भीडमध्ये राहात नाही, मी कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो. संजय राऊत यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करु नयेत ते माझे मित्र आहेत” [/svt-event]

[svt-event title=”ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी” date=”07/10/2020,2:47PM” class=”svt-cd-green” ] ओबीसी नेते हरिभाऊ राठोड , मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष युसूफ मणियार बैठकीला उपस्थित, मराठा समाजाला ओबीसी समाजाचा पूर्ण पाठिंबा, पाठिंबा देण्यासाठी ओबीसी नेत्यांची हजेरी [/svt-event]

[svt-event title=”सचिन सावंत मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, भाजप आयटीसेलविरोधात पुरावे देणार” date=”07/10/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत मुंबई पोलीस आयुक्त परामबीर सिंग यांच्या भेटीला, सुशांत सिंग प्रकरणात भाजपच्या आयटी टीमने महाराष्ट्र सरकारला सोशल मीडियावर बदनाम केल्याचे पुरावे सादर करणार [/svt-event]

[svt-event title=”माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी समाजाच्या वर नको- संभाजीराजे” date=”07/10/2020,12:39PM” class=”svt-cd-green” ] आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या, पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजसोबतच खाली बसणार. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायच्या त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी समाजाच्या वर नको. [/svt-event]

[svt-event title=”संभाजीराजेंचं भाषण” date=”07/10/2020,12:41PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार” date=”07/10/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”PHOTO | ‘हरयाणवी क्वीन’चे गुपचूप लग्न, सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन!” date=”07/10/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मोदीजी, एकटे असताना हात हलवण्यापेक्षा तुमचं मौन सोडा: राहुल गांधी ” date=”07/10/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”डेकोरेटर व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात, मुख्यमंत्र्यांकडे मागणी” date=”07/10/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!” date=”07/10/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”राज ठाकरेंनी मोदी सरकारकडे मागणी करावी, पेणमधील मूर्तीकार ‘कृष्णकुंज’वर” date=”07/10/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”पुणे, नागपूर जिल्ह्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी शिवशाही जादा बस सोडणार” date=”07/10/2020,11:19AM” class=”svt-cd-green” ] कोरोना पार्श्‍वभूमीवर पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाहतुकीदरम्यान गैरसोय होणार दूर, एसटी प्रशासनाकडून या मार्गांवर शिवशाहीच्या जादा गाड्या सोडणार, पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गावर मर्यादित थांबे देऊन या मार्गावर वातानुकूलित 9 शिवशाही, अतिरिक्त फेऱ्यांची वाहतूक सुरू करण्यात येणार [/svt-event]

[svt-event title=”हिवाळी अधिवेशनात कोरोनाबाबत विशेष खबरदारी” date=”07/10/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ] हिवाळी अधिवेशनात कोरोनाबाबत विशेष खबरदारी, सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, प्रशासन लागलं अधिवेशनाच्या तयारीला, कोरोनामुळे काँग्रेस आमदाराचा अधिवेशनाला विरोध, ‘कोरोनावर मात करण्यासाठी विधिमंडळात निगेटीव्ह प्रेशर’, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिक शहरातील 270 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त” date=”07/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] नाशिक शहरातील 270 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त, आतापर्यंत 376 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांस झाली कोरोनाची बाधा, सध्या 4 अधिकारी आणि 27 कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद महापालिका निवडणूक लांबण्याची चिन्हे” date=”07/10/2020,11:03AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद महापालिका निवडणूक लांबण्याची चिन्हे, औरंगाबाद महापालिका प्रभाग रचनेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, पुढील निर्णयापर्यंत सर्वच प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश, प्रभाग रचनेत घोटाळा झाल्याच्या आरोपावरून सुप्रीम कोर्टात दाखल होती याचिका, प्रभागरचना ही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा होता याचिकेत आरोप [/svt-event]

[svt-event title=”राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण औरंगाबादमध्ये” date=”07/10/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण औरंगाबादमध्ये, राज्याचा रिकव्हरी रेट 80 टक्क्यांचा तर औरंगाबादचा 84.53 टक्के, कोरोना रुग्ण झपाट्याने बरे होत असल्यामुळे औरंगाबादकरांना दिलासा, संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कोंढवा, कृष्णानगर स्मशानभूमी येथे घराला आग” date=”07/10/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात कोंढवा, कृष्णानगर स्मशानभूमी जवळ एका घरामध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग, सुदैवाने आगीत कुणी जखमी नाही, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना काळात कुपोषणाचा विळखा” date=”07/10/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोना काळात जिल्ह्यात पडला कुपोषणाचा विळखा, औरंगाबाद जिल्ह्यात 497 बालके तीव्र कुपोषित, तर 1983 बालके मध्यम कुपोषित, औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कुपोषणाचे प्रमाण वाढले, जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्र बंद झाल्याचाही मोठा परिणाम [/svt-event]

[svt-event title=” टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”07/10/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]