[svt-event title=”पत्री पुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर काम पूर्ण झालं असतं, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका” date=”22/11/2020,6:16PM” class=”svt-cd-green” ] पत्रीपुलाच्या कामाचा इव्हेंट केला नसता तर आज गार्डरचे काम पूर्ण झाले असते. पुलाच्या कामाचा बाजार मांडला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांची शिवसेने वर घणाघाती टीका, आता मेगाब्लॉक कधी मिळणार ? मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका करत उपस्थित केला सवाल, गर्डरच्या लॉंन्चिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. [/svt-event]
[svt-event title=”आम आदमी पार्टीचे वीजबिल माफीसाठी शरद पवांराच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन” date=”22/11/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीकडून आंदोलन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग निवासस्थानाबाहेर घंटानाद आंदोलन, अर्थ खातं राष्ट्रवादीकडे असल्यामुळे अजित पवारांनी महावितरणला निधी उपलब्ध करून देण्याची आपची मागणी, यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. [/svt-event]
[svt-event title=”पदवीधर निवडणुकांनंतर राज्यातील सरकार बदलण्याच्या हालचाली होणार, प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य” date=”22/11/2020,5:00PM” class=”svt-cd-green” ] पदवीधर निवडणुकांनंतर राज्यातील सरकार बदलण्याच्या हालचाली होणार असल्याचं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलंय. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जालन्यातल्या परतूरमध्ये मेळावा पार पडला..त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील जनता ही आज त्रस्त असून उद्या महाराष्ट्रातल्या पाचही जागा भाजपनं जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय, हे स्पष्ट होईल. त्यामुळं तुमच्या एक वर्षाच्या सरकाला जनता त्रस्त झाली, असल्याचं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं वक्तव्य दरेकर यांनी केलंय. [/svt-event]
[svt-event title=”LIVE मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार” date=”22/11/2020,2:26PM” class=”svt-cd-green” ]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेतhttps://t.co/zsd0aHUckx pic.twitter.com/r6RFlacKea
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
[svt-event title=”जळगावात शाळा सुरु करण्याबाबत उद्या निर्णय, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती” date=”22/11/2020,1:27PM” class=”svt-cd-green” ] शिक्षकांच्या कोरोना चाचणीला आपण सुरुवात केली आहे. सातशे शिक्षकांची कोरोना चाचणीला झाली आहे. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. उद्या बैठक घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरु” date=”22/11/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यातील शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्य ठरेल असे पोलीस, आरोग्य खात्याचा म्हणणं आहे. त्यामुळे 4 जानेवारीला शाळा सुरू करणार असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या बैठकीत सोलापूरमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ बैठक रोखली ” date=”22/11/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ] सोलापूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत उडाला गोंधळ, महाविकास आघाडीच्या बैठकीत व्यासपीठावरील फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो गायब असल्यानं, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांतनी व्यासपीठावरील मंत्र्यांना विचारला जाब, सुशीलकुमार शिंदे आगे बडोचा दिला नारा,पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आलीय. [/svt-event]
[svt-event title=”तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, 4 हजार दर्शन पास संपले” date=”22/11/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारची सुट्टी असल्याने राज्यभरातुन भाविक तुळजापूरला दर्शनासाठी आले असून 4 हजार दर्शन पासची मर्यादा संपली असली तरी भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. कोरोना लॉकडाउन नंतर मंदिर उघडल्यानंतर पहिलाच रविवार व सुट्टी असल्याने गर्दी होत आहे. [/svt-event]
[svt-event title=”पंढरपुरातील कार्तिकी एकादशीची यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात, 25 ते 27 विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद” date=”22/11/2020,12:11PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पाश्वर्भूमी यंदाची कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.कार्तिकी यात्रेला भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून 25 ,26, 27 , नोव्हेंबरला श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. देवाचे नित्योपचार मात्र परंपरेनुसार करण्यात येणार तसेच 26 तारखेची कार्तिक यात्रेची शासकीय महापूजा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे सपत्निक करणार आहेत. मात्र, तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घेण्याची गरज: अजित पवार” date=”22/11/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढलेत, अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला,जम्बो कोविड हॉस्पिटल उभारले, अनेक निष्पाप लोकांना कोरोनामुळे जावं लागलं, मी तर एवढी काळजी घेतली तरी मला आणि दिलीप वळसे पाटील यांना कोरोना झाला. यामध्ये फक्त काळजी घेण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. वारीबद्दल आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागले. शाळा सुरू करण्याबाबत पालकांचा दबका आवाज येत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये पालक शिक्षक संघटनांचा प्रशासनाच्या बैठकीपूर्वी शाळा सुरू करण्यास स्पष्ट विरोध” date=”22/11/2020,11:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये पालक शिक्षक संघटनांचा शाळा सुरू करण्यास स्पष्ट विरोध, थोड्याच वेळात शाळा सुरू करण्याबाबतच्या बैठकीला होणार सुरुवात, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी राहणार उपस्थित,संघटनांचा रोष बघता ,प्रशासन शाळा महाविद्यालये बंदच ठेवण्याची शक्यता. [/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, राज्यातील भाजप नेत्यांना कोरोनाची जाणीव करुन देण्याची अपेक्षा ” date=”22/11/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ]
गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
[svt-event title=”मंदिर सुरु झाल्यानंतरचा पहिला रविवार, पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी” date=”22/11/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पाश्वर्भूमी 26 नोव्हेंबर रोजी होणारा कार्तिकी एकादशी यात्रेचा सोहळा देखील प्रशासनाने प्रतिकात्मक स्वरूपात करण्याचा निर्णय घेत 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. वारकऱ्यांनी त्यापूर्वीच पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. मात्र, विठ्ठल मंदिरात ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय मुखदर्शनला मंदिरात प्रवेश नसल्याने अनेक भाविक नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेत आहेत. [/svt-event]
[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षण जनजागृती चौक सभांचे आयोजन ” date=”22/11/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज नवी मुंबई येथे मराठा जोडो अभियान अंतर्गत मराठा संघर्ष यात्रेच्या मराठा आरक्षण जनजागृती चौक सभा घेतल्या जाणार आहेत. सकाळी 10 वाजल्या पासून वाशी शिवाजी चौक येथून या अभियान ला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, कळवा या ठिकाणी चौक सभा होणार आहेत. नेरुळ येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर या यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. संघर्ष यात्रेचे समन्वयक विनोद साबळे यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात अॅग्रोटेक कंपनींत गॅसची टाकी कोसळली, दोघांचा मृत्यू” date=”22/11/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते ऍग्रो इंडस्ट्री कारखान्यातील मिथेन गॅसची टाकी पडली. टाकी पडल्यानंतर टाकीतून विषरी वायू बाहेर पडल्यानं दोन कामगारांचा मृत्यू तर आठ कामगार आठ कामगार अस्वस्थ आहेत. कामगारांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविले असून ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”रायगडमध्ये पनवेल महापालिका वगळता शाळा सुरु होणार” date=”22/11/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] रायगड जिल्ह्यात पनवेल महापालिका क्षेत्र व लगतच्या शाळा वगळून 545 शाळामध्ये 9 वी ते 12 वीचे वर्ग रोज 4 तासांसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी 8 हजार 935 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 2500 जणांची चाचणी झाली असून 1000 जणांचे अहवाल आले आहेत. पनवेल मधील 6 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शाळांच्या निर्जंतुकी करणाची मोहीम सध्या सुरु असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षेच्या निकालातही त्रुटी” date=”22/11/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ]
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षेच्या निकालातही त्रुटी, 18 हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण! https://t.co/1eX9sMvwBy @samant_uday @CMOMaharashtra @OfficeofUT #exam
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
[svt-event title=”मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर” date=”22/11/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ]
Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवरhttps://t.co/UFQ79QbtHA #Mumbai #MumbaiLocal #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2020
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह | TV9 Marathi Live ” date=”22/11/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]