Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown Effect : लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट, उजनी काठावर पक्षांचा मुक्त विहार

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी फ्लेमिंगो हा देखणा पक्षी हजारोच्या संख्येत थव्याने मुक्त संचार करताना दिसून येत आहे.

Lockdown Effect : लॉकडाऊनमुळे प्रदूषणात घट, उजनी काठावर पक्षांचा मुक्त विहार
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 4:21 PM

सोलापूर : कोरोनाने जगभर सर्वत्र हाहाकार (Lockdown Effect On Birds) माजवला आहे. त्यामुळे जगातील अनेक देशासह भारतातही लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे पर्यावरणातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या पक्षांना कधी नव्हे इतका मुक्त संचार करावयास मिळत आहे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणात घट झाल्यामुळे शेकडो किलोमीटरचे अंतर पार करुन आलेल्या स्थलांतरीत पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचे आश्रयस्थान असणाऱ्या उजनी जलाशय (Ujani Dam Solapur) परिसरात पक्षांचा मुक्त संचार दिसून येत (Lockdown Effect On Birds) आहे.

उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी वरदायिनी आहे. त्याचबरोबर हे धरण परिसर देशी विदेशी पक्ष्यासाठी नंदनवन समजलं जातं. या परिसरात थंडीच्या हंगामात अनेक परदेशी पक्षी येत असतात. देशी आणि स्थानिक स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने इथे हजेरी लावतात. यंदाच्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उजनीमध्ये पक्ष्यांसाठी अत्यंत पुरक अशा प्रकारचे वातावरण होते. त्यातच लॉकडाऊनची भर पडली.

लॉकडाऊनमुळे नदी पात्रात माणसांची वर्दळ आजिबात नाही. मासळी बाजार बंद असल्याने मासेमारीही बंद आहे आणि पक्षी पर्यटनसुद्धा बंद आहे. माणसांचा संपर्क नदीपात्रात अत्यंत कमी झाल्यामुळेच पक्षांना मोकळीक मिळाली असल्याचे पक्षी अभ्यासकांचे (Lockdown Effect On Birds) मत आहे.

धरण परिसरात बाहेरुन येणार्‍या पक्षांचीही अद्याप मोठ्या संख्येने रेलचेल आहे. यामध्ये फ्लेमिंगो, चक्रवाक बदक, नदीसुरय, कुरकीरा, मुग्धबलाक आदि पक्षी मोठ्या संख्येने आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी फ्लेमिंगो हा देखणा पक्षी हजारोच्या संख्येत थव्याने मुक्त संचार करताना दिसून येत आहे. करड्या, पांढर्‍या अशा विविध रंगाचे आणि आकारातील बगळे, चित्रबलाक, करड्या रंगाचा करकोचा, वकील, वंचक, शराटी, वारकरी बदक आदि प्रकारचे स्थानिक पक्षी उजनी धरणपात्रात मुक्तपणे बागडत आहेत. अन्य कोणतीही वर्दळ आणि भितीशिवाय पक्षांची मुक्तशाळा नदीकाठी भरत आहे.

मुबलक मिळणारे जलीय अन्न, निर्भय वातावरण यामुळे उन्हाळ्यात प्रजनन आणि वीण करणाऱ्या पक्ष्यांसाठी हा कालावधी अत्यंत पोषक आणि सुरक्षित बनला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्ष्यांची संख्या वाढीस या लॉकडाऊनचा फायदा होंणार असल्याचं मत अभ्यासकांनी (Lockdown Effect On Birds) व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

सोलापुरात महिलेसह 2 चिमुकल्यांची कोरोनावर मात, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घरी रवानगी

सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर

'संमेलनात ५० लाख आणि मर्सिडीज देऊन सहभागी?',गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा
'संमेलनात ५० लाख आणि मर्सिडीज देऊन सहभागी?',गोऱ्हेंबद्दल राऊतांचा दावा.
खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही..., मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार
खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही..., मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार.
'दोन मर्सिडीजवर एक पद', नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप
'दोन मर्सिडीजवर एक पद', नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप.
'ते गयेगुजरे, त्यांना चारदा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज'
'ते गयेगुजरे, त्यांना चारदा आमदारकी दिली, त्यांनी ठाकरेंना 8 मर्सिडीज'.
कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर
कोकाटेंना कोर्टान शिक्षा सुनावल्यानंतरही कारवाई नाही, मोठी माहिती समोर.
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम
'दहा वेळा साड्या बदलणारे, भविष्यात..',राऊतांचा भाजपच्या मंत्र्यावर नेम.
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय
धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित? सामंत म्हणाले,तर शिंदेंशिवाय पर्याय.
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?
'छावा' बघणं 'त्या' दोघांच्या अंगाशी थेट पोलिसांकडून बेड्या, कारण काय?.
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं
IND vs PAK आज महामुकाबला, भारताच्या यशासाठी होमहवन अन् देवाला साकडं.
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा
'नार्वेकरांचं 'ते' म्हणणं म्हणजे धादांत लबाडी', सुषमा अंधारेंचा निशाणा.