थाटामाटात भूमीपूजन, दोन वर्ष उलटूनही पहिला हायब्रिड अँन्युटी प्रकल्प अपूर्ण, 80 कोटींचा मार्ग अद्याप रखडलेला
लोणावळा पवनानगर या प्रमुख जिल्हा मार्गाच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लोणावळा : महाराष्ट्रातील पहिला हायब्रिड अँन्युटी प्रकल्पातील रस्ता म्हणून भूमीपूजन (Hybrid Annuity Project) करण्यात आलेल्या लोणावळा पवनानगर या प्रमुख जिल्हा मार्गाच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरु आहे (Hybrid Annuity Project).
महाराष्ट्रातील पहिला वहिला हायब्रीड अँन्युटी प्रकल्पातील मार्गावरुन प्रवास करण्याचं मावळवासीयांचं स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. हे स्वप्न सोडाच सध्या पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. लोणावळा ते पौड या मार्गाचे सप्टेंबर 2018 मध्ये भूमीपूजन झाले होते. त्यामुळे स्थानिक मेटाकुटीला आले आहेत.
80 कोटींचा हा मार्ग बहुतांश रखडलेला आहे. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन गेल्या सत्ताधाऱ्यांनी मतदारांना हे प्रलोभन दाखवलं होतं. पण आता सत्तेत महाविकासआघाडी आली. भाजपच्या सत्तेतील कामं रखडवण्याची प्रथा सुरु असल्याने हे काम पूर्ण होणार की नाही? अशी चर्चाही सुरु असते. पण ही चर्चा बाजूला ठेऊन मतदारांनी हा मार्ग तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशाराhttps://t.co/LnqIYgGxrt #Maharashtra #rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2020
Hybrid Annuity Project
संबंधित बातम्या :
Khadakwasla Dam | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांची गर्दी
Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले