PHOTO: राजकीय इतिहासात दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे 20 दिग्गज
राजकीय इतिहासात दीर्घकाळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे 20 दिग्गज | Longest tenure CM chief ministers in Indian
Follow us
देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान सिक्कीमच्या पवन कुमार चामलिंग यांच्याकडे जातो. ते 24 वर्षे 5 महिने सिक्कीमचे मुख्यमंत्री होते. तर पश्चिम बंगालमधील लोकप्रिय नेते ज्योति बसू यांनी 23 वर्षे 4 महिने मुख्यमंत्रिपद सांभाळले.
अरूणाचल प्रदेशमध्ये गोंग अपांग यांनी 22 वर्षे 8 महिने मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान मिळवला. तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी 21 वर्षे 3 महिने मुख्यमंत्रिपद भुषवले. हे दोन्ही नेते पाचवेळा मुख्यमंत्री झाले होते.
मिझोरामच्या ललथनहवला यांनी 21 वर्षे 1 महिना मुख्यमंत्रीपद भुषविले. तर ओदिशाचे नवीन पटनायक यांच्या नावावर 20 वर्षे 8 महिने मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम आहे.
त्रिपुरातील लोकप्रिय नेते माणिक सरकार यांनी 20 वर्षे राज्याचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. तर तामिळनाडूत एम. करुणानिधि (19 वर्षे) यांनी चारवेळा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची कामगिरी करून दाखवली होती.
अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांच्या नावावर 18 वर्षे 11 महीने मुख्यमंत्रीपद भुषविण्याच्या विक्रमाची नोंद आहे. तर हिमालच प्रदेशात यशवंत सिंह परमार यांनी तब्बल 18 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते.
राजस्थानच्या मोहन लाल सुखड़िया यांनी 16 वर्षे 6 महिने मुख्यमंत्रिपदावर राहण्याची कामगिरी करुन दाखविली होती. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे 15 वर्षे 10 महिने राज्याचे प्रमुख होते.
नागालँडच्या एस.सी. जमीर यांनी 15 वर्षे 5 महिने मुख्यमंत्रीपद भुषविले. आसाममध्ये तरुण गोगोई यांनी हे तीन टर्म (15 वर्षे) मुख्यमंत्री होते.
काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनी 15 वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भुषविले. तर छत्तीसगढच्या रमण सिंह यांनीही तीन टर्म (15 वर्षे) मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा मान मिळवला आहे.
पश्चिम बंगालमध्ये बिधान चंद्र राय यांनी 14 वर्षे 6 महिने मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान मिळवला होता. तर विलियमसन संगमा हे 14 वर्षे 5 महिने मेघालयचे मुख्यमंत्री होते.
बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हेदेखील आता देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत 14 वर्षे 3 महिने बिहारचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. तर हरियाणाच्या बन्सीलाल यांनी 14 वर्षे 3 महिने मुख्यमंत्रीपद भुषविले.