Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात शेतकऱ्यांची लूट, हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी

शासनाने सोयाबीनसाठी ठरवून दिलेला हमीभाव 3880 रुपये आहे. पण शेतकऱ्यांना क्विंटलमागे 1000 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

विदर्भात शेतकऱ्यांची लूट, हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 1:10 PM

नागपूर : राज्यात अनेक पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना लूटण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोयाबीन पिकासाठी शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा 3880 आहे. पण भिवापूरच्या बाजारात सोयाबीनला फक्त 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून शेतऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. तसा आरोप भिवापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे. (in Nagpur Soyabin is purchased below the guaranteed price fixed by the government)

भिवापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत लूट

भिवापूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला 2800 रुपये प्रति क्विंटल दर दिला जातोय. शासनाने सोयाबीनला 3880 रुपये हमीभाव ठरवून दिलेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र, व्यापारी सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने करत आहेत. त्यामुळे क्विंटलमागे जवळपास 1000 रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.

हेही वाचा :   देशात वर्षभरात 10 हजार 281 शेतकरी आत्महत्या, दुर्देवाने महाराष्ट्राचा क्रमांक पहिला

शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की, विदर्भात आधीच 80 टक्के सोयाबीनचं नुकसान झालं आहे. जे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे, त्यालाही भाव मिळत नाहीये. केंद्र सरकारनं सोयाबीनसाठी 3880 रुपये हमीभाव ठरवून दिला आहे. पण, विदर्भातील  कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला 2800 रुपये प्रति क्विंटलपासून दर मिळतोय. म्हणजे प्रति क्विंटल, साधरण 1000 रुपयांची शेतकऱ्यांची लूट होत आहे.’ उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यात त्यांनाही शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं आढळलं आहे. त्यांनी शेतीमालाची खरेदी हमीभावानेच झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, नापिकी, कर्ज, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढत आहेत.  2018 मध्येदेखील शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र सर्वात पुढे होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 या एकाच वर्षात तब्बल 10 हजार 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी कर्जमाफी होऊनही, महाराष्ट्रात तब्बल 3 हजार 594 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. महत्त्वाचं म्हणजे बिहारसारख्या राज्यात या वर्षात एकाही शेतकरी किंवा शेतमजुराने आत्महत्या केल्याची नोंद नाही.

संबंधित बातम्या :

खासगी कंपन्यांनाही शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा लागणार, काँग्रेसचा केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ‘मॉडल अ‍ॅक्ट’

Prakash Javadekar | ऊसाला आता प्रतिटन 2850 रुपये हमीभाव : प्रकाश जावडेकर

(in Nagpur Soyabin is purchased below the guaranteed price fixed by the government)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.