KP Oli | “खरी अयोध्या नेपाळमध्ये, प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी!” नेपाळच्या पंतप्रधानांचा जावईशोध

खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यावेळी आधुनिक वाहतूक आणि मोबाईल फोनसारखी दळणवळणाची साधने नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा प्रश्न नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी विचारला.

KP Oli | खरी अयोध्या नेपाळमध्ये, प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी! नेपाळच्या पंतप्रधानांचा जावईशोध
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 8:24 AM

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांना खुर्ची संकटात येताच प्रभू रामावरुन राजकारण करण्याची बुद्धी झाल्याचे दिसत आहे. खरी अयोध्यानगरी भारतात नसून नेपाळमध्ये आहे, तर प्रभू रामचंद्रही नेपाळी होते, असा जावईशोध ओली यांनी लावला. (Lord Ram is Nepali not Indian claims Nepal Prime Minister KP Sharma Oli)

आपली सत्ता जात असल्याचे पाहून ओली सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. सोमवारी त्यांनी दावा केला की सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने ‘बनावट अयोध्या’ तयार केली. खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यावेळी आधुनिक वाहतूक आणि मोबाईल फोनसारखी दळणवळणाची साधने नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा प्रश्न त्यांनी विचारला.

भारत आपल्याला सत्तेवरुन दूर करण्याचा कट रचत आहे, असे ओली यापूर्वी म्हणाले होते. जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केपी ओली कधी नवीन नकाशात भारतीय प्रदेश दाखवत आहेत, तर कधी नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी भारतातून आलेल्या लोकांना दोष देत आहेत.

हेही वाचा : चीननंतर नेपाळनेही बेटकुळ्या दाखवल्या, भारताच्या तीन प्रांतांवर दावा, नव्या नकाशालाही मंजुरी

नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या 206 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान ब्ल्यू वॉटर येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की “नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार होत आहेत. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली जात आहे. आमचा अजूनही विश्वास आहे की आम्ही भारतीय राजपुत्र रामाला सीता दिली”

भगवान राम यांच्या जन्मस्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ओली यांना स्वतःच्या देशातही टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेपाळी नेत्यांनी ओली यांच्या वक्तव्याचा उघडपणे विरोध केला आहे. भारत आणि नेपाळमध्ये तणावाची परिस्थिती असताना ओली यांनी वादग्रस्त दावे टाळावेत, असा सल्ला त्यांना दिला जात आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाचे सहअध्यक्ष कमल थापा म्हणाले की पंतप्रधानांनी अशी निराधार विधानं टाळली पाहिजेत. थापा यांनी ट्विट केले आहे की, “पंतप्रधान तणावाचे निराकरण करण्याऐवजी नेपाळ-भारत संबंध बिघडवू इच्छित आहेत, असे दिसते.” (Lord Ram is Nepali not Indian claims Nepal Prime Minister KP Sharma Oli)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.