अखेर धक धक गर्ल माधुरी दीक्षितही Me Too बद्दल बोलली!

मुंबई: गेल्या वर्षभरापासून देशभरात मी टू (Me Too) मोहिमेने बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रात खळबळ उडवून दिली. लेखिका, दिग्दर्शक विंता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणासह बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय ‘गुलाब गँग’ चे दिग्दर्शक सौमिक सेन यांच्यावरही तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या दोन्ही कलाकारांसोबत धक धक गर्ल, अभिनेत्री माधुरी दीक्षितने काम […]

अखेर धक धक गर्ल माधुरी दीक्षितही Me Too बद्दल बोलली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई: गेल्या वर्षभरापासून देशभरात मी टू (Me Too) मोहिमेने बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रात खळबळ उडवून दिली. लेखिका, दिग्दर्शक विंता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणासह बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय ‘गुलाब गँग’ चे दिग्दर्शक सौमिक सेन यांच्यावरही तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या दोन्ही कलाकारांसोबत धक धक गर्ल, अभिनेत्री माधुरी दीक्षितने काम केलं होतं.

नुकतंच पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत माधुरीला या दोन्ही कलाकारांचं नाव #MeToo मध्ये आल्याने दु:ख झालं का, असं विचारण्यात आलं. त्यावर माधुरीने दोन गोष्टी सांगितल्या. माधुरी म्हणाली, अशा गोष्टी हैराण करणाऱ्या असतात. कारण तुम्ही त्यांना ओळखता, मात्र अशा पद्धतीने त्यांची ओळख नसते. दुसरं म्हणजे, माझ्यासाठी ही अत्यंत धक्कादायक बाब होती. मला त्यांची असलेली ओळख आणि मी त्यांच्याबाबत जे वाचत होते, ऐकत होते, त्यावरुन वाटतं की या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या.

माधुरीची ‘टोटल धमाल’ दरम्यान, माधुरी दीक्षित आगामी टोटल धमाल या सिनेमात झळकाणार आहे. या सिनेमात अभिनेते अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एका गुजराती दाम्पत्याची भूमिका साकारत आहे. या दोघांशिवाय अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी हे सुद्धा लीड रोलमध्ये आहेत. धमाल सिनेमाचा तिसरा भाग म्हणजे ‘टोटल धमाल’ असून इंद्र कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 22 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

टोटल धमाल या सिनेमानंतर माधुरी दीक्षित करण जोहरच्या ‘कलंक’ या सिनेमात दिसणार आहे. माधुरीसोबत या सिनेमात संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर झळकणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.