आजीच्या डोळ्यांदेखत रुग्णालयातून बाळाला पळवून नेलं; सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे पोलिसांचा शोध सुरु

मध्य प्रदेशात एका महिलेने आजीच्या डोळ्यादेखत नवजात बाळाला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

आजीच्या डोळ्यांदेखत रुग्णालयातून बाळाला पळवून नेलं; सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे पोलिसांचा शोध सुरु
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 9:22 AM

भोपाळ : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका महिलेने आजीच्या डोळ्यादेखत नवजात बाळाला पळवून (New Born Baby Stolen) नेल्याची घटना समोर आली आहे. ही महिला मोठ्या चलाखीने बाळाच्या आजीसमोरुन त्याला घेऊन पसार झाली. या घटनाचा सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलं आहे. त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत (New Born Baby Stolen).

मध्य प्रदेशातील इंदूर येथील महाराजा यशवंतराव रुग्णालयात ही घटना घडली. 15 नोव्हेंबरला दिवसाढवळ्या रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

इंदूरचे एसपी विजय खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या बाळ चोरणाऱ्या महिलेने आजीला सांगितलं की बाळाचे हृदयाचे ठोके अस्थिर वाटत आहे. हे ऐकल्यावर आजी घाबरली. महिलेने बाळाला तपासणीसाठी घेवून जायला हवं असं सांगितलं. त्यामुळे आजी त्या महिलेसोबत तपासणीसाठी निघाली. मात्र, वाटेतच महिला बाळाला घेवून पसार झाली.

या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे. यामध्ये महिला बाळाला घेवून रुग्णालयात उभी आहे. बाळाची आजीही तिच्यासोबत आहे. दोघीही रुग्णलायात सोबत चालताना आणि बोलताना दिसत आहे. मात्र, यानंतर नेमकं कुठून ती महिला या बाळाला घेवून पळाली हे सीसीटीव्हीत आलेलं नाही (New Born Baby Stolen).

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या महिलेला शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

New Born Baby Stolen

संबंधित बातम्या :

कल्याणमधील थरार! बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा, 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास

बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.