आयसिसशी संबंधित 9 जण विषप्रयोग करणार होते, ATS चा खळबळजनक दावा

मुंबई: आयसिसशी संबंधित ज्या 9 जणांना अटक केली, ते पाणी किंवा जेवणातून विषप्रयोग करणार होते, असा खळबळजनक दावा ATS ने केला आहे. कुंभ किंवा इतर कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात हा विषप्रयोग केला जाणार होता. नेमकं कुठे हा विषप्रयोग करणार होते, त्याचा आम्ही तपास करतोय, असं एटीएसने सांगितलं. इतकंच नाही तर अटकेतील 9 जणांपैकी 2 इंजिनियर आहेत, […]

आयसिसशी संबंधित 9 जण विषप्रयोग करणार होते, ATS चा खळबळजनक दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई: आयसिसशी संबंधित ज्या 9 जणांना अटक केली, ते पाणी किंवा जेवणातून विषप्रयोग करणार होते, असा खळबळजनक दावा ATS ने केला आहे. कुंभ किंवा इतर कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात हा विषप्रयोग केला जाणार होता. नेमकं कुठे हा विषप्रयोग करणार होते, त्याचा आम्ही तपास करतोय, असं एटीएसने सांगितलं. इतकंच नाही तर अटकेतील 9 जणांपैकी 2 इंजिनियर आहेत, एक अल्पवयीन आहे तो 11 वी सायन्सचा विद्यार्थी आहे, तर एक आरोपी फार्मासिस्ट आहे. आरोपींमध्ये 3 भाऊ आहेत. या सर्वांनी उम्मत-ए- मोहमदिया नावाचा ग्रुप बनवला होता. त्यांच्याकडे ज्या बॉटल सापडल्या आहेत, त्यावर हायड्रोजन पेरॉक्ससाईड लिहिलं आहे, अशी माहिती एटीएसने दिली.

एटीएसने काल मुंब्रा आणि औरंगाबादेतून या 9 जणांना ताब्यात घेतलं होतं, त्यांना आज अटक केल्याची माहिती एटीएसने दिली.

एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाच्या 12 टीम याबाबत तपास करत होत्या. अटकेतील सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडे लिक्वीड आणि पावडरच्या स्वरुपात केमिकल सापडलं आहे, असंही एटीएसने सांगितलं. आरोपींकडे 6 चाकू, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, वायफाय, राऊटर, Dvd, डोंगल , ग्राफिक्स कार्ड , मोडेम , रॅम सापडली आहे.

9 जण अटकेत

मुंबईजवळच्या मुंब्रा आणि औरंगाबादेतील 9 जणांना एटीएस, एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आणि आयबी (गुप्तचर यंत्रणा) यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आलं. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत चाललेल्या चौकशीनंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणाचा तपास औरंगाबाद एटीएसकडे सोपवला.

एटीएसने काल मुंब्रा आणि औरंगाबादेतून या 9 जणांना ताब्यात घेतलं होतं, त्यांना आज अटक केल्याची माहिती एटीएसने दिली.

एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकाच्या 12 टीम याबाबत तपास करत होत्या. अटकेतील सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडे लिक्वीड आणि पावडरच्या स्वरुपात केमिकल सापडलं आहे, असंही एटीएसने सांगितलं. आरोपींकडे 6 चाकू, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप, वायफाय, राऊटर, Dvd, डोंगल , ग्राफिक्स कार्ड , मोडेम , रॅम सापडली आहे.

मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये सलमान खान,फहाद शाह, जामेन कुटेपडी आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. तर औरंगाबादेतून मोहसिन खान,मोहम्मद मजहर शेख, तकी खान आणि सरफराज अहमदसह आणखी एकाला अटक केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.