बारावीची लढाई सुरु, राज्यातील 15 लाख विद्यार्थी परीक्षेला

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत (Maharashtra Board HSC Exam) आहे.

बारावीची लढाई सुरु, राज्यातील 15 लाख विद्यार्थी परीक्षेला
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 7:22 AM

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरु होत (Maharashtra Board HSC Exam) आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेतून 4 लाख 75 हजार 134 विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 57 हजार 373 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी 9 हजार 923 कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर संपूर्ण राज्यात 3 हजार 036 परीक्षा केंद्र आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी

यंदाच्या बारावीच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच गणित, कला आणि विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी अनेक विषयांच्या पेपरमध्ये एक दिवसांची सुट्टी देण्यात आला (Maharashtra Board HSC Exam) आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी दिली आहे.

राज्यात 273 भरारी पथकं 

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे राज्यात 273 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित असणं आवश्यक असणार आहे. तसेच काही कारणामुळे परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 19 आणि 20 मार्चला घेतली जाणार आहे.

यंदा ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असून त्यावर इंग्रजीसोबत मराठीतूनही सूचना दिल्या गेल्या आहेत. परीक्षा सुरु झाल्यावर काही वेळातच पेपर सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्या पार्श्वूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबईतल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांचे मोबाईल एकत्रित गोळा करुन ठेवले जाणार आहे. हे सर्व मोबाईल पेपर संपल्यानंतर दिले जाणार (Maharashtra Board HSC Exam) आहे.

संबंधित बातम्या : 

दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.