महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 124 वर, मुंबई-ठाण्यात नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासात 10 जणांना, तर ठाण्याच्या दोघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra Corona Case Update)
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती. (Maharashtra Corona Case Update)
सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त ठरलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला सकाळी डिस्चार्ज मिळाला होता. तर रात्री या दाम्पत्याची मुलगी, कुटुंबाला मुंबईहून पुण्याला नेणारा टॅक्सीचा चालक आणि त्यांचा आणखी एक सहप्रवासी यांना घरी पाठवण्यात आले. घरी सोडल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधल्या पहिल्या तीन ‘कोरोना’ग्रस्तांनाही घरी सोडण्यात येणार आहे. पुण्याच्या दाम्पत्यासोबतच दुबईचा प्रवास करुन आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातीलही 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चौघांनाही डिस्चार्ज दिला जाणार आहे.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
मुंबई – 51 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 9 कल्याण – 5 नवी मुंबई – 5 नागपूर – 4 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 ठाणे – 5 सातारा – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1
एकूण 124 (Maharashtra Corona Case Update)
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च
एकूण – 124 कोरोनाबाधित रुग्ण
Total number of #COVID19 positive cases rise to 649 in India (including 593 active cases, 42 cured/discharged people and 13 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/mbn3okwvZp
— ANI (@ANI) March 26, 2020
(Maharashtra Corona Case Update)