Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

आज (28 एप्रिल) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली (Maharashtra Corona Cases Update) आहे.

Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 3:37 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Cases Update) आहे. आज (28 एप्रिल) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबत वसई-विरार, पालघर, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे.

मुंबईला कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मुंबईतील झोपडपट्टी (Maharashtra Corona Cases Update) परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी परिसरातील वीटी बेकरी परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आजच्या दिवसात आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा जणांपैकी 9 रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. यामध्ये रुपीनगर भागातील सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण? 

  • मुंबई – 8
  • पिंपरी चिंचवड – 10
  • औरंगाबाद – 13
  • मालेगाव 36
  • जळगाव – 2
  • हिंगोली – 1
  • नवी मुंबई – 1
  • पालघर – 3
  • वसई विरार – 1
  • कल्याण डोंबिवली – 6
  • नंदुरबार – 2
  • सांगली – 1
  • सातारा – 1
  • अकोला – 3
  • नागपूर – 4

मालेगावात 36 जणांना कोरोना

औरंगाबादमध्ये आज 13 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा 95 वर पोहोचला आहे. यात 6 जण हे 16 वर्षाखाली आहेत. या सर्व रुग्णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मालेगावात आज आणखी 36 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका 9 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 162 वर पोहोचली आहे.

नवी मुंबई, पालघर, वसई विरारला कोरोनाचा विळखा

नवी मुंबईच्या एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाराला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यापाऱ्याचे दुकान धान्य मार्केटमधील G विंगमध्ये होते. त्यामुळे पालिकेने G विंग सील केलं आहे.

पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. हे तिघेही बोईसरमधील दलाल टॉवर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात होते. या तिघांचेही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना बाधितांची संख्या 24 वर पोहोचली आहे.

वसई विरारमध्ये एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे वसई विरार कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 126 वर पोहोचली आहे. तर 8 जणांचा मृत्यू झाला असून 49 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात आज नवे 6 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कल्याण डोबिंवलीतील कोरोनाबाधितांची संख्या 143 वर पोहोचली आहे.

जळगाव, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जळगावातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 24 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

नागपूरात आणखी चार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. हे चारही रुग्ण कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 133 वर पोहोचली आहे.

हिंगोलीत 5 वर्षाच्या बाळाला कोरोना

हिंगोलीमध्ये 5 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या बाळाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हिंगोलीतील कोरोनाबाधितांची संख्या 15 वर पोहोचली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 2 ने वाढली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 13 वर पोहोचली आहे. यातील एक रुग्ण हा आरोग्य केंद्र चालक आहे.

सातारा, सांगलीत प्रत्येकी एका रुग्णाची वाढ

सांगलीत अजून एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कराडमध्ये उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एका 94 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 झाली आहे. तर सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे साताऱ्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 36 वर पोहोचला आहे.

अकोला जिल्ह्यात आज तीन नवे रुग्ण आढळले आहे. यातील एक महिला सिंधी कॅम्प भागातील पॉझिटिव्ह आढळलेल्या  रुग्णाची पत्नी आहे. तर दुसरा रुग्ण हा त्याचाच नोकर आहे. हा नोकर 31 वर्षाचा असून तो भीमनगर येथील रहिवासी आहे. तर तिसरा पॉझिटिव्ह अहवाल हा फेरतपासणीचा असून तो बैदपुरा येथील तीन वर्षीय मुलाचा आहे. त्यामुळे अकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19 झाली (Maharashtra Corona Cases Update) आहे.

संबंधित बातम्या : 

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश

नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.