महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 49 वर, दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर
सोशल डिस्टन्सवर भर देणे, खबरदारी घेणे, गर्दी टाळणे हे उपाय आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. (Maharashtra Corona Patient Update)
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 49 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लंडन आणि दुबईवरुन आलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आधीच कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेले दोघे कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Maharashtra Corona Patient Update)
सकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 42 वर होता, मात्र गेल्या बारा तासात कोरोना रुग्णांचा आकडा सातने वाढला आहे. यूकेहून आलेली 22 वर्षीय तरुणी आणि दुबईवरुन अहमदनगरला आलेला 51 वर्षांचा पुरुष यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. महाराष्ट्रातील 49 रुग्णांपैकी 10 रुग्ण असे आहेत ज्यांना संसर्ग होऊन कोरोना झाला आहे. तर बाकी सर्व परदेश प्रवास करुन आलेले आहेत, असं टोपेंनी सांगितलं.
आयसोलेशन हा सर्वात महत्वाचा विषय आहे. घरी सुरक्षित राहा, गर्दी करु नका. सोशल डिस्टन्सवर भर देणे, खबरदारी घेणे, गर्दी टाळणे हे उपाय आहेत, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
प्रायव्हेट आणि सरकारी कार्यलायातही कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करावी. सरकारी कार्यालय प्रामुख्याने रोटेशननुसार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणार आहे. 50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची एक दिवसाआड उपस्थिती असेल. आज आपण फेज 2 मध्ये आहोत, 3 मध्ये आपल्याला जायचं नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
सर्वात मोठी चिंता लोकलबाबत वाटते. मुंबई लोकल बंद करणे हा शेवटचा मार्ग आहे. आम्ही नेहमीच अपिल करत आहोत. ट्रेनमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. घराबाहेर कमी पडून पब्लिक ट्रान्सपोर्टचा ताण कमी करा. एसटी बसेस 50 ऐवजी 25 प्रवासी बसवले जाणार, बसेसमध्ये एका सीटवर एकच व्यक्ती असेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
12 देशांनी आपल्या देशात येणाऱ्या विमानसेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत आणि आपणही त्या देशात जाणारे विमानसेवा बंद केल्या आहेत. तर हाफकीन लॅब 1-2 दिवसात सुरु होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Two patients who have been tested positive for #Coronavirus are on ventilator at Kasturba Hospital, Mumbai: Rajesh Tope, Maharashtra Minister of Public Health & Family Welfare https://t.co/pT1AYXb2vG
— ANI (@ANI) March 19, 2020
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 11
- पुणे – 8
- मुंबई – 9
- नागपूर – 4
- यवतमाळ – 3
- कल्याण – 3
- नवी मुंबई – 3
- रायगड – 1
- ठाणे -1
- अहमदनगर – 2
- औरंगाबाद – 1
- रत्नागिरी – 1
- उल्हासनगर – 1
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- मुंबई (1) – 17 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
- पुणे (1) – 18 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
- मुंबई (1) – 18 मार्च
- रत्नागिरी (1) – 18 मार्च
- मुंबई महिला (1) – 19 मार्च
- उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
- अहमदनगर (1) – 19 मार्च
Maharashtra Corona Patient Update