Maharashtra Corona Update | राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Maharashtra Corona Update | राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 12:08 AM

मुंबई : राज्यात आज (19 जून) दिवसभरात 3 हजार 827 नवे (Maharashtra Corona Total Cases) कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण 62 हजार 773 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Total Cases).

राज्यात आतापर्यंत 5 हजार 893 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

आज दिवसभरात राज्यात 142 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 5 हजार 893 वर पोहोचली आहे. तर सध्या राज्यात 55 हाजार 651 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात कोरोनाग्रस्त दुप्पट होण्याचा कालावधी 26 दिवसांवर

“राज्यात रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा (डबलिंग रेट) कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे 26 दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे”, अशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra Corona Total Casesकोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर : अजित पवार).

राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात 5 लाख 91 हजार 049 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Total Cases

संबंधित बातम्या :

कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर : अजित पवार

Pune Corona Update | पुणे विभागात 10 हजार रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 4.51 टक्क्यांवर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.