महाराष्ट्र दिनादिवशीच, महाराष्ट्र शब्द हटवला; स्वतंत्र विदर्भसाठी चंद्रपुरात आंदोलन, विदर्भवादी नेत्यांना अटक
शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लगतच्या सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन केले
चंद्रपूर: महाराष्ट्र दिनादिवशी (Maharashtra) चंद्रपुरात विदर्भवाद्यांकडून (Chandrapur Vidharbh) अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर (government office) स्वतंत्र विदर्भाचे पोस्टर्स लावून आंदोलन केले. ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र होते, त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली. यावेळी विदर्भवादी नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स
शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लगतच्या सरकारी कार्यालयांवर विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन केले गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
कार्यकर्त्यांना अटक
विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात अटक केली गेली. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनांची मालिका सातत्याने सुरुच ठेवण्याचा निर्धारही विदर्भवादी नेत्यांनी कायम ठेवला.
तळपत्या उन्हात आंदोलन
महाराष्ट्र दिनादिवशी चंद्रपुरात विदर्भवाद्यांनी याप्रकारे अनोखे आंदोलन केले गेले गेल्याने स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणाही जोरदार पणे देण्यात आल्या. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांकडून सरकारी कार्यालयांवर ‘विदर्भ’ लिहिलेले स्टिकर्स लावून आंदोलन केले गेल्याने आणि जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
आंदोलन सुरुच ठेवणार
ज्या ठिकाणी फलकांवर महाराष्ट्र त्याच ठिकाणी विदर्भ असे स्टिकर्स लावून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले गेल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विश्रामगृहातून निघालेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर असे विदर्भाचे स्टिकर्स लावून आंदोलन आणि घोषणाबाजी केली. स्वतंत्र विदर्भाची मागणी करत, स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशीही घोषणा देत महाराष्ट्र लिहिलेल्या फलकांवर विदर्भाची स्टीकर्स लावून विदर्भवादी नेत्यांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनानंतर विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांच्यासह कार्यकर्त्यांना रामनगर पोलीसांनी अटक केली.स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनांची मालिका सातत्याने सुरुच ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.