Electricity bill | एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय

अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill) आहेत.

Electricity bill | एप्रिल ते जूनचे वीज बिल गेल्या वर्षीइतकेच भरा, राज्य सरकारचा निर्णय
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 21, 2020 | 6:18 PM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार युनिट वापरानुसार राज्य सरकार ग्राहकांना दिलासा देणार आहे. (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill)

या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. 2019 मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. (उदा. जर गेल्यावर्षी तुम्हाला 500 रुपये वीज बिल आले असेल आणि यंदा लॉकडाऊन काळात जर 2000 रुपये विजेचे बिल आले असेल, तर तुम्हाला फक्त 500 रुपये भरावे लागणार आहे)

राज्य सरकार 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 80 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला केवळ 80 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 20 युनिटचे बिल हे राज्य सरकार भरणार आहे.

याच पद्धतीने जर विजेचा वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या 50 टक्के भार हा राज्य सरकार उचलणार आहे. त्याशिवाय जर वीज वापर हा 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25  टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे.

दरम्यान लॉकडाऊन काळात ज्यांनी वीज बिल भरलेले असेल, त्या ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Government Relief Customer Lockdown Electricity bill)

संबंधित बातम्या : 

Electricity Bill | लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले, सरकार आता तरी जागे होईल का? : फडणवीस

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.